राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे... प्रत्येक क्षणाचे LIVE अपडेट्स
आज (31 जानेवारी 2026) सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (बारामती येथील विमान दुर्घटनेत) हे राजकीय संक्रमण घडत आहे. तसेच, आज दुपारी 2 वाजता एनसीपीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवडले जाणार आहेत. याबाबतचे प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...
जाणून घ्या, प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स
Sunetra Pawar: आज (31 जानेवारी 2026) सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (बारामती येथील विमान दुर्घटनेत) हे राजकीय संक्रमण घडत आहे. तसेच, आज दुपारी 2 वाजता एनसीपीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवडले जाणार आहेत. याबाबतचे प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.
- सुनेत्रा पवारांकडून राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा
- थोड्याच वेळात सुनील तटकरे पत्रकारांशी साधणार संवाद; विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
- राज्यपाल देवव्रत आचार्य हे सुनेत्रा पवार यांना लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.










