अर्थसंकल्पाआधीच सोने आणि चांदीच्या किंमतीत झपाट्याने घसरण, ज्वेलर्समध्ये ग्राहक पुन्हा गर्दी करू लागले

मुंबई तक

Gold Prize : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी कमोडिटी मार्केट हादरलं आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेल्या सोने- चांदीच्या भावांत तीन दिवसांत घट निर्माण झाल्याचं चित्र समोर आलं, याबाबतची एकूण माहिती जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

Gold Prize
Gold Prize
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चांदीच्या किंमतीत झालेली ही घसरण सोन्याच्या किंमतीहून अधिक चिंताजनक

point

सोने चांदीच्या किंमतीमुळे मोठी घबराट

Gold Prize : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी कमोडिटी मार्केट हादरलं आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेल्या सोने- चांदीच्या भावांत तीन दिवसांत घट निर्माण झाल्याचं चित्र समोर आलं. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत 9 % लक्षणीय घट झाली. सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीपेक्षा जवळजवळ 13 हजार प्रति ग्रॅमने कमी होताना दिसत आहे. सध्याची किंमत ही 1.40 रुपयांच्या खाली आल्याचं चित्र आहे. 

हे ही वाचा : Budget 2026: मोदी सरकारचं बजेट.. पाहा कपडे, शूजसह काय-काय झालं स्वस्त, 'या' गोष्टी प्रचंड महागणार!

चांदीच्या किंमतीत झालेली ही घसरण सोन्याच्या किंमतीहून अधिक चिंताजनक

चांदीच्या किंमतीत झालेली ही घसरण सोन्याच्या किंमतीहून अधिक चिंतेची बाब असल्याचं दिसून आलं होतं. चांदीच्या किंमतीत 26 हजारांहून अधिक घसरण झाल्याचं बोललं जातंय. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, चांदीच्या किंमत ही मागील सत्रतील उच्चांकापेक्षा 1.28 लाखांनी घसल्याचं सांगितलं जात आहे. सद्यस्थितीत चांदीच्या किंमतीत 2.70 लाखांने वाढ झाल्याचं वृत्त आहे.  

सोने चांदीच्या किंमतीमुळे मोठी घबराट

सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. निप्पॉन इंडिया इंडिया सिल्व्हर ईटीएफ आणि गोल्ड ईटीएफमध्ये 11 % घट निर्माण झाल्याचं चित्र आहे, ज्यामुळे कमी सर्किटमध्ये जावे लागलं आहे. सोने चांदीच्या किंमतीत थेट परिणाम हा शेअर्सवर झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. हिंदुस्तान कॉपर 18 %, तर वेदांत आणि हिंदुस्थान झिंक प्रत्येकी 10 %, तर हिंडाल्को 7 % आणि हिंदुस्तान अॅल्युमिनियम 5 % खाली आहेत. 

हे ही वाचा : Union Budget 2026: देशाचं बजेट सादर, अर्थसंकल्पातून देशवासियांना काय-काय मिळणार?

केंद्रात झालेल्या आर्थिक बजेटपूर्वी ज्वेलर्स असोसिएशन सरकारने सोने आणि चांदीवरील सीमाशुल्कात घट होण्याबाबतची मोठी मागणी केली. कमी किंमतीमुळे ग्राहक पुन्हा दुकानांकडे येतील आणि बाजार पुन्हा सुरळीत होईल असा विश्वास आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp