गौतम अदानींनी घेतली शरद पवार यांची सांत्वनपर भेट
Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यापूर्वी अनेकदा गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. अजित पवार यांच्या निधनाच्या सांत्वनपर भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
विलीनीकरणवरून राजकारण तापलं
Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यापूर्वी अनेकदा गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. अजित पवार यांच्या निधनाच्या सांत्वनपर भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवार हे 1 फेब्रुवारी रोजी बारामतीतून आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी रवाना झाले, त्यानंतर सायंकाळी ही भेट झाल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या विलीनिकरणावर शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, म्हणाले 'मी अजित दादांची शपथ...'
गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. शरद पवार हे सकाळीच बारामतीहून मुंबईकडे रवाना झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या सांत्वनपर ही भेट असल्याची माहिती मीडियातून समोर आली आहे.
एका महिन्यापूर्वीची सांगितली 'ती' आठवण
अजित पवार यांच्या निधनानंतर अदानी यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली देखील वाहिली होती. त्यांनी एका महिन्यापूर्वी, 'आम्ही बारामतीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआयच्या उद्घाटनासाठी एकत्र उभे होते', असं लिहून एका महिन्यापूर्वी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला, त्याच पोस्टमध्ये अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.
.










