केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प मांडणार
Union Budget 2026 : विशेषतः तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या घोषणा अपेक्षित आहेत. उद्योगविश्वाकडूनही या अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलते, याकडे लक्ष आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प मांडणार
तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या घोषणा अपेक्षित
Union Budget 2026, नवी दिल्ली : देशाला आर्थिकदृष्ट्या दिशादर्शक ठरणाऱ्या सन 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत हा अर्थसंकल्प सादर करणार असून, हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असणार आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, देशांतर्गत रोजगारनिर्मितीची गरज आणि वित्तीय शिस्त यांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान यावेळी सरकारपुढे आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन आणि शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. विशेषतः तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या घोषणा अपेक्षित आहेत. उद्योगविश्वाकडूनही या अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलते, याकडे लक्ष आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या आयात शुल्कांचा (टॅरिफ) फटका भारतीय उद्योगांना बसू नये, यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी करसवलती, प्रोत्साहन योजना किंवा नवीन धोरणात्मक घोषणा होऊ शकतात. त्याचबरोबर आर्थिक सुधारणांचा वेग कायम ठेवत पुढील टप्प्याची दिशा ठरवली जाऊ शकते.










