अजितदादांच्या अपघाताचं कारण समोर येणार का? विमान प्राधिकरणाचे लोक घटनास्थळी पोहोचले; पाहा VIDEO
Baramati Plane Crash Update : बारामती विमान अपघाताच्या घटनास्थळी हालचालींना वेग आलाय. बारामतीतील घटनास्थळी विमान प्राधिकरणाचे अधिकारी दाखल झाले आहेत. अपघाताला चार दिवस उलटल्यानंतर अखेर दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजितदादांच्या अपघाताचं कारण समोर येणार का?
विमान प्राधिकरणाचे लोक घटनास्थळी पोहोचले; पाहा VIDEO
Baramati Plane Crash Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलीये. अजूनही लोकं दु:खातून बाहेर आलेले नाहीत. दरम्यान, हा अपघात कशामुळे झाला? असा सवाल महाराष्ट्रातील लोकांना पडलाय. असं असताना बारामती विमान अपघाताच्या घटनास्थळी हालचालींना वेग आलाय. बारामतीतील घटनास्थळी विमान प्राधिकरणाचे अधिकारी दाखल झाले आहेत. अपघाताला चार दिवस उलटल्यानंतर अखेर दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विमान प्राधिकरणाच्या पथकाने आज सकाळी मजुरांच्या मदतीने जळालेल्या विमानाचा अर्धा भाग क्रेनच्या सहाय्याने कंटेनरमध्ये हलवला. घटनास्थळी जिथे-जिथे विमानाचे जळालेले भाग पडले होते, त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाने स्पष्ट मार्किंग करण्यात आले आहे. संपूर्ण जळालेले अवशेष दोन लाकडी पेट्यांमध्ये भरून पुढील तपासासाठी नेले जाणार आहेत.
अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी 28 जानेवारी रोजी बारामतीला पोहोचणार होते. मात्र, त्याच दिवशी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास लँडिंग करत असताना हे विमान अपघातग्रस्त झाले होते. या भीषण दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघातानंतर विमानाला तात्काळ भीषण आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण विमान जळून खाक झाले. गेल्या चार दिवसांपासून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आणि तपास प्रक्रियेसाठी हे अवशेष हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभांसाठी निघालेल्या अजित पवार यांचे विमान लँडिंगच्या वेळी रनवेच्या जवळ कोसळले. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. अपघातानंतर विविध तपास यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून प्राथमिक तपास केला असून आता निर्णायक मानला जाणारा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे.
हेही वाचा : जवळच्या नातेवाईकांकडून तरुणीच्या मृतदेहासोबत लैंगिक संबंध, हादरवून टाकणारं प्रकरण
ब्लॅक बॉक्समधून समोर येणार अपघाताचं कारण
नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Learjet विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यानची प्रत्येक हालचाल, वेग, उंची, इंजिनची स्थिती आणि कॉकपिटमधील संभाषणाची नोंद असते. जरी त्याला ‘ब्लॅक बॉक्स’ म्हटले जात असले, तरी तो प्रत्यक्षात नारंगी रंगाचा मजबूत डबा असतो. स्फोट, आग, प्रचंड उष्णता किंवा पाण्यात बुडाल्यानंतरही त्यातील डेटा सुरक्षित राहील, अशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते. ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण झाल्यानंतर या अपघातामागचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मानवी चूक, तांत्रिक बिघाड की हवामानाचा परिणाम, यापैकी नेमका कोणता घटक कारणीभूत ठरला, हे तपासातून समोर येणार आहे.










