एकत्र आयुष्य संपवण्याचं प्रेयसीला आश्वासन... विवाहित प्रियकराने भयंकर पद्धतीने काढला काटा! नेमकं काय घडलं?

मुंबई तक

एका विवाहित पुरूषाने आपल्या प्रेयसीशी वर्षानुवर्षे शारीरिक संबंध ठेवले. मग जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा प्रियकराने वेगळाच गेम केला. संबंधित तरुणीने तिच्या प्रियकराच्या जाळ्यात अडकून आपला जीव गमावला.

ADVERTISEMENT

प्रियकराने भयंकर पद्धतीने काढला प्रेयसीचा काटा!
प्रियकराने भयंकर पद्धतीने काढला प्रेयसीचा काटा!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकत्र आयुष्य संपवण्याचं प्रेयसीला आश्वासन...

point

विवाहित प्रियकराने भयंकर पद्धतीने काढला काटा!

Crime News: केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातून प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका विवाहित पुरूषाने आपल्या प्रेयसीशी वर्षानुवर्षे शारीरिक संबंध ठेवले. मग जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा प्रियकराने वेगळाच गेम केला. संबंधित तरुणीने तिच्या प्रियकराच्या जाळ्यात अडकून आपला जीव गमावला. दोघेही एकत्र मरण्यासाठी आले होते, पण प्रियकराने तिच्यासोबत मोठा गुन्हा केला. 

लग्नाच्या दबावाला कंटाळून भयानक कट 

आरोपी तरुण त्याच्या प्रेयसीवर अल्पवयीन असल्यापासून प्रेम करत होता. तो आधीच विवाहित होता, पण तरीही ती मुलगी त्याच्यावर प्रेम करत होती. पण एके दिवशी, आरोपी प्रियकराने तरुणीला त्याच्या वर्कशॉपमध्ये बोलवलं आणि नंतर तिची निर्घृण हत्या केली. नंतर, त्याने ती घटना आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आरोपीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आणि सत्य उघडकीस आणलं. केरळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही संपूर्ण घटना कोझिकोडच्या कक्कोडी परिसरात घडली. आरोपीचं नाव वैशाखन असं असून त्याचे मृत तरुणीसोबत बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कालांतराने, पीडितेने त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. खरं तर, वैशाखन आधीच विवाहित होता, म्हणून त्याला तिच्यापासून सुटका हवी होती. लग्नाच्या दबावाला कंटाळून त्याने एक भयानक कट रचला. 

फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

24 जानेवारी रोजी, वैशाखनने त्याच्या प्रेयसीला फोन करून सांगितलं की आपण या जगात एकत्र राहू शकत नाही, त्यामुळे आपण दोघांनी एकत्र आयुष्य संपवायला हवं. त्याने त्या तरुणीला त्याच्या वर्कशॉपमध्ये बोलवलं जेणेकरून ते दोघे आत्महत्या करू शकतील. आरोपी प्रियकराच्या बोलण्याने ती प्रेयसी त्याच्या जाळ्यात अडकली. वर्कशॉपमध्ये आल्यानंतर आरोपीने प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि गुन्हा केल्यानंतर, आरोपीने ती आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर, स्थानिकांना त्या वर्कशॉपमध्ये महिलेचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. 

हे ही वाचा: पुणे: अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार! भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी

मात्र, तपासादरम्यान मृत तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांच्या जबाबांमुळे आणि तरुणीच्या कॉल डिटेल्समुळे पोलिसांना वेगळाच संशय झाला. पोलिसांनी आरोपी वैशाखनला ताब्यात घेऊन त्याची कठोर चौकशी केली तेव्हा त्याच्या जबाबात विरोधाभास दिसू लागले. अखेर, मानसिक दबाव आणि पुराव्यांअभावी, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने पीडितेला एकत्र आयुष्य संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्याचा हेतू फक्त तिला त्याच्या मार्गावर हटवण्याचा होता. तपासादरम्यान, आणखी एक भयानक सत्य समोर आले. वैशाखनने मृत तरुणीवर ती अल्पवयीन असतानाच लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली असल्याचं पोलिसांना आढळून आलं. या माहितीच्या, पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.  तसेच, तपासात समोर आलं की आरोपी आधीच विवाहित होता, ही बाब त्याने महिलेपासून लपवली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp