बीडच्या शिरुरमध्ये 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या, धक्कादायक कांड समोर

मुंबई तक

Beed crime : बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये एका 30 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालत ठेचून ठार मारलं. ही घटना सकाळी उघडकीस आल्याचं चित्र आहे. खून करण्यात आलेला तरुण हा रंगकाम करायचा, एका शिवारात त्याचा मृतदेह आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ADVERTISEMENT

Beed crime
Beed crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार

point

30 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालत ठेचून ठार मारलं

Beed Crime : बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये एका 30 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालत ठेचून ठार मारलं. ही घटना सकाळी उघडकीस आल्याचं चित्र आहे. खून करण्यात आलेला तरुण हा रंगकाम करायचा अशी माहिती समोर आली. एका शिवारात त्याचा मृतदेह आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परिस्थिती पाहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या खूनाचा शोध सुरु केला. 

हे ही वाचा : इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म, वसतिगृहात उडाला गोंधळ

बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समोर

दरम्यान, बीड जिल्ह्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. बीडच्या शिरुर तालुक्यातील शिरुर पोलीस ठाणे परिसरातील खोकर मोहर येथे तरुणावर दगडाने हल्ला करत खून करण्यात आला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : अजितदादांच्या अंत्यसंस्कारादरम्यान 20 लाख रुपयांचे दागिने चोरीला, बारामती पोलिसांनी आवळल्या मुसक्या

खोकर मोहर शिवारात तरुणाचा मृतेदह

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तपास केला असता, तेव्हा खोकर मोहर शिवारात तरुणाचा मृतेदह आढळून आल्याचे वृत्त समोर आले. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु ठेवला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हागारीत वाढ होताना दिसतेय. या वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp