'मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौर', मीरा-भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीचा एल्गार

मुंबई तक

Mira-Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये महापौर पदाच्या निवडीनंतर मराठी-अमराठी हा नवा वाद उफळल्याचं चित्र आहे. मीरा-भाईंदरमध्ये डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौरपदाची निवड करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Meera Bayandar
Meera Bayandar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मीरा-भाईंदर महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता

point

'मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून महापौर बसवला'

Meera Bayandar : मीरा-भाईंदरमध्ये महापौर पदाच्या निवडीनंतर मराठी-अमराठी हा नवा वाद उफळल्याचं चित्र आहे. मीरा-भाईंदरमध्ये डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौरपदाची निवड करण्यात आली आहे. यामुळे आता मराठी एकीकरण समितीसह मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र आहे.

हे ही वाचा :  मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौरपदावरून मराठी एकीकरण समितीचं तीव्र आंदोलन, अध्यक्ष म्हणाले, 'नरेंद्र मेहता दुसरे मोरारजी देसाई...'

मीरा-भाईंदर महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता

आज 3 फेब्रुवारी बुधवार रोजी मीरा-भाईंदर महापौरपदाची निवड करण्यात आली. यात भाजपच्या डिंपल मेहता यांनाच महापौरपदी बसवण्यात आलं. डिंपल मेहता यांना 79 मते मिळवत दुसऱ्यांदा महापौरपद मिळवले. या निवडणुकीनंतर मराठी एकीकरण समितीसह मनसेनं मीरा-भाईंदरमध्ये मराठी महापौर असावा अशी सरकारकडे मागणी केली होती. पण, त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. सरतेशेवटी मीरा-भाईंदर महापालिकेत दुसऱ्यांदा अमराठी व्यक्तीस महापौरपदी बसवण्यात आले. 

यावरून मराठी एकीकरण समिती आणि मनसे यांनी महापौरपदाच्या विरोधात मोर्चा काढला. मराठी माणूस पेटून उठणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

हे ही वाचा :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ! अजितदादांना नेमकं काय हवं होतं?

'मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून महापौर बसवला'

मराठी भाषा, शहरे टिकावी, मराठी माणसांचं अस्तित्व टिकाव. मुंबई गुजरातमध्ये जाईल या कारणाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता, त्याच लढ्यात 107 हुतात्म्यांनी जीवाचं बलीदान दिलं आणि मराठी राज्य स्थापन झालं. आता मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून महापौर बसवला गेला, याला आमचा विरोध असल्याचं सांगत मराठी एकीकरण समितीने एल्गार पुकारला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp