मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौरपदावरून मराठी एकीकरण समितीचं तीव्र आंदोलन, अध्यक्ष म्हणाले, 'नरेंद्र मेहता दुसरे मोरारजी देसाई...'
Mira-Bhayandar : 'डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होत आहेत, आमचा आधी देखील त्यांना विरोधच होता. नरेंद्र मेहता हे आमदार आहेत, इथं दुसरे मोरारजी देसाई तयार होत आहेत, घराणेशाही देखील पाहायला मिळते', असं वक्तव्य मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीनंतर वातावरण तापलं
'मीरा-भाईंदर शहर आगरी कोळ्यांचे'
Mira-Bhayandar : 'डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होत आहेत, आमचा आधी देखील त्यांना विरोधच होता. नरेंद्र मेहता हे आमदार आहेत, इथं दुसरे मोरारजी देसाई तयार होत आहेत, घराणेशाही देखील पाहायला मिळते', असं वक्तव्य मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केलं आहे. एवढंच नाहीतर त्यांनी आंदोलन तीव्र करू असा देखील इशारा दिला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मराठी महापौरपदाची मागणी पूर्ण केली जावी अशी विनंती केली आहे.
हे ही वाचा : नागपूर: M.D Medicine डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं, 'त्या' कारणाने तरुणाने पंख्य़ाला गळफास घेत संपवलं जीवन
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीनंतर वातावरण तापलं
मराठी एकीकरण समितीने पुन्हा आज 3 फेब्रुवारी रोजी आंदोलनाला सुरुवात केली आहे. या घडमोडीमुळे मराठी मुलखातून तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांच्या नावाची महापौर पदासाठी वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. मात्र, याला मराठी एकीकरण समितीसह मनसे देखील विरोध दर्शवला आहे.
'नरेंद्र मेहता दुसरे मोरारजी देसाई...'
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितलं की, रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची मागणी आहे की, मीरा-भाईंदर महापालिकेत मराठी महापौर करा. एक महिन्यांपासूनच आमची मागणी आहे. डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होत आहेत, आमचा आधी देखील त्यांना विरोधच होता. नरेंद्र मेहता हे आमदार आहेत, इथं दुसरे मोरारजी देसाई तयार होत आहेत, घराणेशाही देखील पाहायला मिळते.
हे ही वाचा : लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत उडी मारत तरुणीनं संपवलं जीवन, कारण आलं समोर










