KDMC : अखेर प्रशासकीय राजवट संपली; कल्याण-डोंबिवली महापालिकेला 6 वर्षांनी मिळाले महापौर आणि उपमहापौर

मिथिलेश गुप्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील 1983 नंतरची सर्वात मोठी प्रशासकीय राजवट आता संपुष्टात आली आहे. कल्याण डोंबिवलीला तब्बल 6 वर्षांनंतर महापौर आणि उपमहापौर मिळाले असून आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. महापौर पदी शिंदे गटाच्या ॲड. हर्षाली थविल-चौधरी यांची, तर उपमहापौर पदी भाजपच्या राहुल दामले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  

ADVERTISEMENT

KDMC Mayor
KDMC Mayor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अखेर प्रशासकीय राजवट संपली

point

कल्याण-डोंबिवली महापालिकेला 6 वर्षांनी मिळाले महापौर आणि उपमहापौर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील 1983 नंतरची सर्वात मोठी प्रशासकीय राजवट आता संपुष्टात आली आहे. कल्याण डोंबिवलीला तब्बल 6 वर्षांनंतर महापौर आणि उपमहापौर मिळाले असून आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. महापौर पदी शिंदे गटाच्या ॲड. हर्षाली थविल-चौधरी यांची, तर उपमहापौर पदी भाजपच्या राहुल दामले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  

कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने तसे पाहता आजची ही निवडणूक म्हणजे निव्वळ औपचारिकता होती. मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल या पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. 

हे ही वाचा : मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौरपदावरून मराठी एकीकरण समितीचं तीव्र आंदोलन, अध्यक्ष म्हणाले, 'नरेंद्र मेहता दुसरे मोरारजी देसाई...'

 ..आणि प्रशासकीय राजवट संपली

विशेष म्हणजे 1983 नंतरची सर्वात मोठी असणारी प्रशासकीय राजवटही आता अवघ्या काही तासांत संपुष्टात आली आहे. 1983 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर लागू झालेली प्रशासकीय राजवट तब्बल 1995 पर्यंत म्हणजेच तब्बल 12 वर्षे होती. त्यानंतर कोविडमुळे 2020 मध्ये कार्यकाळ संपल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. मात्र आता कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाल्याने गेल्या 6 वर्षांपासून असलेली ही प्रशासकीय राजवटही संपुष्टात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp