राहुल गांधींना का आणि कशासाठी संसदेत बोलण्यापासून रोखलं? असा विषय तरी काय ज्यामुळे लोकसभेत तुफान राडा?

मुंबई तक

Rahul Gandhi Loksabha: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोकलाममधील चिनी घुसखोरीचा उल्लेख केल्याने लोकसभेत गोंधळ उडाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर सभापती ओम बिर्ला यांनी नियमांचा हवाला देत राहुल गांधींना अडवले.

ADVERTISEMENT

why and for what reason was rahul gandhi prevented from speaking in parliament what was exact issue caused massive uproar congress vs bjp
(Photo: X/@SansadTV)
social share
google news

नवी दिल्ली: लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मोठा गोंधळ झाला. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोकलाममध्ये कथित चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करताच सभागृहातील वातावरण तापले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही उभे राहून विरोधकांच्या दाव्याला विरोध केला. राहुल गांधींच्या भाषणादरम्यान सुमारे 45 मिनिटे गोंधळ सुरू राहिला, ज्यामुळे सभागृह तहकूब करावे लागले. त्यानंतर पुन्हा एकदा सभागृह सुरू झाल्यानंतर राहुल गांधी उभे राहिले आणि त्यांनी आपल्या मूळ मुद्द्यावर भाषण करण्यास सुरुवात केली. पण त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षांकडून रोखण्यात आलं आणि तासाभरासाठी सभागृह स्थगित करण्यात आलं. अखेर तिसऱ्यांदा सभागृह सुरू होताच राहुल गांधींनी चीनविषयी बोलण्यास सुरुवात करताच सत्ताधाऱ्यांनी यावर पुन्हा आक्षेप घेतला. ज्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी संपूर्ण दिवसासाठी सभागृहाचं कामकाज गे स्थगित केलं. पण राहुल गांधींना नेमका कोणता मुद्द्या मांडायचा होता आणि त्यांना का रोखलं जात होतं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

राहुल गांधींना कोणत्या विषयावर बोलण्यापासून रोखलं?

राहुल गांधींनी आपले विचार मांडताना एका मासिकाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा हवाला दिला. त्यांनी सुरुवातीला आरोप केला की, सरकार या पुस्तकाचे प्रकाशन रोखत आहे. त्यांनी दावा केला की डोकलामशी संबंधित महत्त्वाची तथ्ये दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि सरकार सत्य बाहेर येण्यापासून रोखत आहे. यावेळी राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. ज्याचं अद्याप प्रकाशन झालेलं नाही. 

राहुल गांधींच्या या विधानावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ताबडतोब उभे राहिले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दाव्यांचा आधार विचारला. राजनाथ सिंह म्हणाले की, 'पुरावे नसताना इतके गंभीर आरोप करता येत नाहीत.' यावेळी राहुल गांघींनी हे देखील म्हटले की, पुस्तक प्रकाशित झालेले नाही. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केला.

हे ही वाचा>> मोठी बातमी: NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव ठरलं, प्रफुल पटेल नाही तर कोकाटेंनी केली 'यांच्या' नावाची घोषणा

अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित केला की, 'प्रकाशित न झालेले पुस्तक सभागृहात कसे उद्धृत केले जाऊ शकते?' त्यांनी सांगितले की राहुल गांधी यांनी तथ्यांचा विपर्यास केला आहे. गृहमंत्र्यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या विधानाचाही उल्लेख केला आणि स्पष्ट केले की, 'तेजस्वी सूर्या यांनी विरोधकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते.' यापूर्वी, राहुल गांधींनी तेजस्वी सूर्या यांच्यावर विरोधकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp