"त्याने माझ्यासोबत नको ते..." प्रसिद्ध युट्यूबरवर महिलेचे गंभीर आरोप! दीड वर्ष ओलीस ठेवलं अन्...
पीडितेने एका प्रसिद्ध युट्यूबरवर अतिशय गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. संबंधित महिलेला त्याने ओलीस ठेवलं, तिचं शारीरिक शोषण केलं आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रसिद्ध युट्यूबरवर महिलेचे गंभीर आरोप!
दीड वर्ष ओलीस ठेवून नको ते करायला लावल्याचा आरोप
Crime News: एका महिलेने प्रसिद्ध युट्यूबर शादाब जकाती याच्यावर अतिशय गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. संबंधित महिलेला शादाबने ओलीस ठेवलं, तिचं शारीरिक शोषण केलं आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शादाबने तिला सुमारे दीड वर्ष ओलीस ठेवलं आणि झाडू मारणे, फरशी पुसणे, भांडी धुणे यासारखी घरातील कामे करायला लावल्याचा आरोप चांदनी उर्फ तबस्सुम नावाच्या महिलेने केले. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
'नीच माणूस' असल्याचा महिलेचा आरोप
छत्तीसगडची रहिवासी असलेली चांदनी आरोप करत म्हणाली की शादाबने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडलं. महिलेच्या म्हणण्यानुसार, शादाबने तिला धमकावलं की पोलिस आणि न्यायालयात त्याच्या ओळखी आहेत. पीडितेने आरोपीच्या कृत्यांना विरोध केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. चांदनीने शादाबला 'नीच माणूस' म्हटलं आणि तो केवळ चांगला असल्याचं भासवतो, असा आरोप केला.
मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं अन्...
फेब्रुवारी 2025 मध्ये चांदनी तिच्या व्हिडिओचं प्रमोशन करत असताना शादाबला भेटली. शादाबने तिला मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि तिला रील्समध्ये त्याच्यासोबत काम करण्याची संधी दिली, त्यानंतर तिचं शारीरिक शोषण झालं. चांदनीचा पती हा मुझफ्फरनगरचा बॅटरी ऑपरेटर होता आणि त्यानेच तिला यासाठी प्रोत्साहित केलं होतं.
हे ही वाचा: 15 दिवसांच्या बाळाचं अपहरण अन्... आरोपी यूनुस सिंधी अटकेत; आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
याप्रकरणी महिलेने दावा केला की शादाबने त्याच्या टीममधील जॉनी नावाच्या एका सदस्याचं यूट्यूब चॅनल बळकावलं, त्याला आधीच सिल्व्हर बटण मिळाले होतं. आता चांदनीने शादाबसोबत काम करणाऱ्या इतर महिलांना सुद्धा न घाबरता पुढे येऊन त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट कृत्यांबद्दल सांगण्याचं अपील केलं होतं. इंचौली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अशी कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नसून तक्रार मिळाल्यानंतर चौकशी केली जाईल. या प्रकरणाबाबत शादाबशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु अद्याप त्याच्याशी संपर्क झालेला नसल्याचं सांगितलं जात आहे.










