बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याची हत्या, डिलीव्हरी बॉयने डोक्यात हेल्मेट घालून संपवलं
Crime News : शिवम गुप्ता हा व्यावसायिक 2 जानेवारीच्या संध्याकाळी आपल्या एका मित्रासोबत कनॉट प्लेस येथे पार्टीसाठी गेला होता. पार्टीदरम्यान राजीव चौक मेट्रो स्थानकाजवळ काही डिलिव्हरी बॉयसोबत त्याचा वाद झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही क्षणांतच हिंसक झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तीन तरुणांनी मिळून शिवमवर हल्ला केला आणि हेल्मेटने त्याच्या डोक्यावर मारहाण केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याची हत्या
डिलीव्हरी बॉयने डोक्यात हेल्मेट घालून संपवलं
Crime News ,दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात उशिरा रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 36 वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. मित्रांसोबत पार्टीसाठी घराबाहेर पडलेला शिवम गुप्ता पुन्हा कधीच घरी परतू शकला नाही. काही दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर 19 जानेवारी रोजी शिवमने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणात फुड डिलिव्हरी करणाऱ्या काही तरुणांनी किरकोळ वादातून हेल्मेटने डोक्यावर जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.
पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात राहणारा शिवम गुप्ता हा व्यावसायिक 2 जानेवारीच्या संध्याकाळी आपल्या एका मित्रासोबत कनॉट प्लेस येथे पार्टीसाठी गेला होता. पार्टीदरम्यान राजीव चौक मेट्रो स्थानकाजवळ काही डिलिव्हरी बॉयसोबत त्याचा वाद झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही क्षणांतच हिंसक झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तीन तरुणांनी मिळून शिवमवर हल्ला केला आणि हेल्मेटने त्याच्या मारहाण केली.
3 जानेवारीच्या पहाटे सुमारे 1.30 वाजता दिल्ली पोलिसांना पीसीआर कॉल आला. रस्त्याच्या कडेला एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शिवमला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे निदर्शनास आले. शिवमची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तो जबाब देण्याच्या स्थितीत नव्हता.
दरम्यान, शिवम घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. काही वेळाने पोलिसांचा फोन आला आणि शिवम रुग्णालयात दाखल असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 4 जानेवारी रोजी शिवमला राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवण्यात आले. 5 जानेवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी पुढील 36 ते 72 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. काही काळ प्रकृतीत सुधारणा दिसून आली आणि कुटुंबीयांना आशा वाटू लागली, मात्र 19 जानेवारी रोजी शिवमचा मृत्यू झाला.










