इंस्टाग्रामवर पत्नीचा प्रियकरासोबत फोटो पाहिला अन् वाद टोकाला पोहचला... रात्री घराबाहेर बोलवून पतीलाच संपवलं!

मुंबई तक

सोशल मीडियावर सुरू झालेल्या अनैतिक प्रेमसंबंधामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मृताच्या पत्नीचे तिच्या शेजारी राहणाऱ्या मिंटू कुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.

ADVERTISEMENT

घराबाहेर बोलवून पतीलाच संपवलं!
घराबाहेर बोलवून पतीलाच संपवलं!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टाग्रामवर पत्नीचा प्रियकरासोबत फोटो पाहिला अन्...

point

नंतर, घराबाहेर बोलवून पतीलाच संपवलं!

Crime News: सोशल मीडियावर सुरू झालेल्या अनैतिक प्रेमसंबंधामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली असून येथील नगर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी (3 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास पान मसाला दुकानदार मनोज कुमार यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी मृताची पत्नी निशू कुमारी हिला अटक केली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

इंस्टाग्रामवर पत्नीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध... 

मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीचे तिच्या शेजारी राहणाऱ्या मिंटू कुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली होती. वृत्तानुसार, मनोजच्या पत्नीने इंस्टाग्रामवर तिच्या प्रियकरासोबतची स्टोरी पोस्ट केली होती आणि त्यावरूनच तिचा तिच्या पतीशी मोठा वाद झाला. या भांडणानंतर, पत्नी घर सोडून गेली. घटनेच्या दिवशी, पीडित मनोजला फोन करून घराबाहेर बोलवण्यात आलं. त्यानंतर, पती लगेच घराच्या बाहेर गेला मात्र, त्यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने त्याची गळा चिरून निर्घृण हत्या केली. घटनेनंतर, परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. 

हे ही वाचा: प्रतिक्षा करुन वैगातगलेले वाहनचालक झोपी गेले, अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतरही 'पुणे-मुंबई एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडी

या प्रकरणासंबंधी मृताच्या आई आणि मामीने मनोजच्या पत्नीवर त्याची हत्या केल्याचा आरोप केला. त्यानंतर, नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी एफएसएल टीमच्या मदतीने घटनेचा तपासही सुरू केला आहे. सध्या, या घटनेतील आरोपी पत्नी पोलिसांच्या अटकेत असून तिचा प्रियकर मिंटू कुमार आणि मृताच्या मेहुण्याला अटक करण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत. 

हे ही वाचा: PWD मध्ये नोकरीचं अमिष; तरुणीवर आठ वर्षांपासून सामूहिक बलात्कार, 'या' खासदाराचा पीए फरार

पोलिसांनी दिली माहिती 

या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी रोजी नगर पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर, मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या तपासासाठी एफएसएल टीमची देखील मदत घेण्यात आली. मृताच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचं तपासात समोर आलं. घटनेच्या दिवशी, पत्नीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवरून तिचा तिच्या पतीसोबत वाद झाला. या भांडणानंतर, पत्नी घर सोडून निघून गेली. त्यानंतर, रात्री उशीरा पतीला फोन करून घराबाहेर बोलवण्यात आलं आणि त्यावेळी त्याची आरोपींनी गळा चिरून निर्घृण हत्या केली. घटनेतील आरोपी म्हणजेच मृताच्या पत्नीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून तिच्या प्रियकराला अटक ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp