प्रतिक्षा करुन वैगातगलेले वाहनचालक झोपी गेले, अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतरही 'पुणे-मुंबई एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडी
Pune-Mumbai Expressway traffic jam : विशेषतः पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे जिल्ह्यातील लोणावळा बायपास एक्सप्रेस वे तसेच जुन्या मार्गांवर अडकून पडली आहे. मावळ तालुक्यातील अनेक भागांत वाहनांची अक्षरशः रांगच्या रांगा लागल्या आहेत. वाहनचालक तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर झोपी गेले आहेत. रस्त्याच्या मधोमधच वाहने दिवसभर ठप्प होती. त्यामुळे झोपी जाण्याचा प्रकार घडल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनेक वाहनचालक झोपी गेले,
अपघातग्रस्त टँकर हटवला पण तरीही
'पुणे-मुंबई एक्सप्रेस वे'वर मोठी वाहतूक कोंडी
Pune-Mumbai Expressway traffic jam , पुणे : आडोशी बोगद्या जवळ अपघातग्रस्त झालेला टँकर तब्बल 32 तासांनंतर अखेर रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला असला तरी देखील मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी अजूनही तशीच आहे. टँकर हटवण्यात आल्यानंतरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र आहे.
विशेषतः पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे जिल्ह्यातील लोणावळा बायपास एक्सप्रेस वे तसेच जुन्या मार्गांवर अडकून पडली आहे. मावळ तालुक्यातील अनेक भागांत वाहनांची अक्षरशः रांगच्या रांगा लागल्या आहेत. वाहनचालक तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर झोपी गेले आहेत. रस्त्याच्या मधोमधच वाहने दिवसभर ठप्प होती. त्यामुळे झोपी जाण्याचा प्रकार घडल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढली आहे.
बोरघाट घाट विभागातील वाहतूक जरी सध्या मोकळी झाली असली, तरी टँकर अपघाताचे परिणाम त्या पलीकडेही जाणवत आहेत. जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर देखील अशीच परिस्थिती असून, वाहनांची संथ गती आणि ठप्प वाहतूक यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अनेक प्रवासी, कुटुंबीय आणि मालवाहू वाहनचालक रात्रभर रस्त्यावरच अडकून राहिल्याचे चित्र आहे.










