प्रेयसीच्या आईलाही शिवम आवडायचा; नकार देताच आई संतापली, शिवमसोबत नेमकं काय केलं?
Crime News : एका अल्पवयीने मुलाने २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केला आहे. मात्र हा खून करण्याचं कारण ऐकून धक्का बसेल. खून झालेल्या २० वर्षीय तरुणाचं नाव शिवम असं आहे. शिवमचं त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होतं. धक्कादायक म्हणजे त्या मुलीच्या आईलादेखील शिवम आवडायचा. तिला शिवमसोबत प्रेमसंबंधात याययं होतं. मात्र शिवमने याला नकार दिला. याच कारणामुळे शिवमचा खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीच्या आईलाही शिवम आवडायचा
नकार देताच आई संतापली
शिवमसोबत नेमकं काय केलं?
Crime News : एका अल्पवयीने मुलाने २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केला आहे. मात्र हा खून करण्याचं कारण ऐकून धक्का बसेल. खून झालेल्या २० वर्षीय तरुणाचं नाव शिवम असं आहे. शिवमचं त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होतं. धक्कादायक म्हणजे त्या मुलीच्या आईलादेखील शिवम आवडायचा. तिला शिवमसोबत प्रेमसंबंधात याययं होतं. मात्र शिवमने याला नकार दिला. याच कारणामुळे शिवमचा खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. दिल्लीच्या वेस्ट डिस्ट्रिक्ट परिसरातील ही घटना आहे. शिवमचा खून कुणी आणि कसा केला, जाणून घेऊया.
हे ही वाचा : PWD मध्ये नोकरीचं अमिष; तरुणीवर आठ वर्षांपासून सामूहिक बलात्कार, 'या' खासदाराचा पीए फरार
प्रेयसीच्या आईलाही आवडायचा शिवम
शिवम दिल्लीतील वेस्ट डिस्ट्रिक्ट परिसरात रहायचा. त्याचे शेजारी राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या मुलीच्या आईलादेखील शिवम आवडायचा. ती सतत शिवमच्या घरी यायची. शिवमच्या आईने आरोप केला आहे की, ती शिवमला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करायची. यासाठी तिनं जादूटोणा केल्याचाही आरोप शिवमच्या आईनं केला आहे. यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला. यानंतर त्यांच्या समाजाच्या झालेल्या जात पंचायतीत हे प्रकरण मिटवण्यात आले. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांसोबत बोलायचं नाही असा निर्णय झाला. पण मुलीची आई शिवमची पाठ सोडायला तयारच नव्हती.
प्रेयसीच्या अल्पवयीन भावाने केली हत्या
शिवमचे ज्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते त्या मुलीच्या अल्पवयीन भावाची शिवमसोबत मैत्री होती. जात पंचायतीत झालेल्या प्रकारामुळे तो नाराज होता. त्याच रागाच्या भरात त्याने शिवमची चाकूने भोसकून हत्या केली. २ फेब्रुवारी रोजी रात्री हत्येनंतर तो फरार झाला आहे. शिवमच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, 'आईच्या सागंण्यावरुनच त्याने हा खून केला आहे.'










