'कोरियन गेम'च्या नादात तिघींनी गमावला जीव; मधल्या बहिणीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर...
रात्री 2:30 वाजता तिन्ही बहिणींनी एका कोरियन गेमच्या नादात जीव गमावल्याचं वृत्त आहे. निशिका, प्राची आणि पाखी या तीन अल्पवयीन बहिणींनी पहाटे 2.15 वाजताच्या सुमारास इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'कोरियन गेम'च्या नादात तिघींनी गमावला जीव
मधल्या बहिणीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर...
Crime News: उत्तर प्रदेशातील गाजियाबादच्या भारत सिटी सोसायटीमध्ये घडलेल्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे स्थानिकांमध्ये सुद्धा भितीचं वातावरण पाहायला मिळतंय. रात्री 2:30 वाजता तिन्ही बहिणींनी एका कोरियन गेमच्या नादात जीव गमावल्याचं वृत्त आहे. निशिका, प्राची आणि पाखी या तीन अल्पवयीन बहिणींनी पहाटे 2.15 वाजताच्या सुमारास इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. निशिका 16 वर्षांची, प्राची 14 वर्षांची आणि पाखी 12 वर्षांची असल्याची माहिती आहे.
कोरियन लव्हर गेमचं व्यसन
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणासंबंधी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. खरं तर, या तिन्ही बहिणींना ज्या कोरियन लव्हर गेमचं व्यसन होतं, त्या गेमची कमांडर मधली बहीण प्राची होती, असं सांगण्यात येत आहे. प्राची या ऑनलाइन गेमला लीड करत होती आणि इतर दोन बहिणी तिच्या आदेशांचं पालन करत होत्या.
हे ही वाचा: 'कोरियन गेम'चा शेवटचा टास्क... प्राचीची कमांड अन् तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला!
गेमचा 50 वा टास्क...
मृतांच्या वडिलांचं नाव चेतन कुमार असून ते सोसायटीत आपल्या पत्नी आणि मुलींसोबत राहत होते. वडिलांनी या घटनेबद्दल सांगितलं की, बऱ्याच काळापासून त्यांच्या तिन्ही मुलींना या कोरियन लव्हर गेमचं व्यसन लागलं होतं. त्यावेळी, तिला समजावण्याचा देखील खूप प्रयत्न करण्यात आला, पण तरीसुद्धा त्या लपुनछपून ही गेम खेळायच्या. घटनेच्या दिवशी म्हणजे काल या गेमचा शेवटचा (50 वा) टास्क होता.
9 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
या तिन्ही बहिणी आंघोळ, जेवण आणि झोपण्यापासून ते शाळेत जाण्यापर्यंत सर्व कामे एकत्र करायच्या. आता या तिघींनी मिळून 9 मजल्यावरून उडी मारली आणि आपलं आयुष्य संपवलं. पोलीस संबंधित मुलींचा मोबाईल फोन आणि त्या गेमचा देखील तपास करत आहेत. ज्या लिंकवरून पीडित मुलींना या धोकादायक गेम खेळायला प्रवृत्त केलं, त्याचा देखील पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.










