'कोरियन गेम'चा शेवटचा टास्क... प्राचीची कमांड अन् तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला!

मुंबई तक

रात्री जवळपास 2:30 वाजताच्या सुमारास तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिघी बहिणी 'कोरियन लव्हर' नावाच्या टास्क-आधारित ऑनलाइन गेमची बळी ठरल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'कोरियन गेम'चा शेवटचा टास्क...

point

प्राचीची कामांड अन् तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला!

Suicide Case: रात्री जवळपास 2:30 वाजताच्या सुमारास तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील गाजियाबादच्या भारत सिटी सोसायटीत घडली असून मृत बहिणी या 16, 14 आणि 12 वर्षांच्या होत्या. दरम्यान, या तिघी बहिणी 'कोरियन लव्हर' नावाच्या टास्क-आधारित ऑनलाइन गेमची बळी ठरल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. 

टास्क पूर्ण करण्यासाठी जीव दिला... 

मुलींचे वडील चेतन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुली बऱ्याच दिवसांपासून हा खेळ खेळत होत्या आणि काल त्याचा 50 वा म्हणजेच शेवटचा टास्क होता. हा टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी आत्महत्या करण्यास मागे-पुढे पाहिलं नाही. 9 व्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारण्यासाठी, त्यांनी दोन पायऱ्या असलेल्या शिडीचा वापर केला, जेणेकरून त्या रेलिंगवर पोहोचतील. यांच्यातील मधली बहीण म्हणजेच 14 वर्षीय प्राची ही त्या गेमची लीडर होती. ती तिच्या बहिणींना कमांड द्यायची आणि तिघी मिळून ते काम पूर्ण करायच्या. 

हे ही वाचा: ऑनलाइन गेमिंगचं व्यसन, आई-वडिलांनी मोबाईलच काढून घेतला... शेवटी, मुलाने संपवलं आयुष्य

सुसाइड नोटमध्ये काय आढळलं? 

पोलिसांना घटनास्थळी एक पानी सुसाइड नोट सापडली असून त्यात "मम्मी पप्पा सॉरी..." असं लिहिलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, मुलींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच, पोलिस आता "कंट्रोलर" किंवा लिंकचा शोध घेत आहेत ज्याने मुलांना गेम खेळण्यास प्रवृत्त केले. डिजिटल स्क्रीनमागे त्यांच्या मुलींच्या मृत्यूची स्क्रिप्ट रचली जात आहे, याची कुटुंबियांना अजिबात कल्पना नव्हती. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिन्ही मुलींना (निशिका, प्राची आणि पाखी) लोणी येथील रुग्णालयात नेले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या मुली कोणाच्या संपर्कात होत्या? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp