आजीचा नीट उपचार केला नाही; नातवाने दवाखान्यातच डॉक्टरला संपवलं अन् पोलिसांकडे जाऊन... पुढं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : आजीचा योग्य पद्धतीने उपचार न केल्याने एका व्यक्तीने दवाखान्यातच डॉक्टरचा धारदार शस्त्राने खून केला आहे. हा खून केल्यानंतर तो थेट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि हत्येची कबुली दिली. यामुळे पोलिसदेखील हैरान झाले. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तपासणी केली असता डॉक्टरचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आजीचा नीट उपचार केला नाही

point

तरुणाने दवाखान्यातच डॉक्टरला संपवलं अन् पोलिसांकडे जाऊन...

Crime News : आजीचा योग्य पद्धतीने उपचार न केल्याने एका व्यक्तीने दवाखान्यातच डॉक्टरचा धारदार शस्त्राने खून केला आहे. हा खून केल्यानंतर तो थेट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि हत्येची कबुली दिली. यामुळे पोलिसदेखील हैरान झाले. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तपासणी केली असता डॉक्टरचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली. पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील ही घटना आहे. दरम्यान, जीवन रुईदास (28) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे ही वाचा : आईच्या प्रियकराला भर रस्त्यात भोसकलं; छातीवर पाय ठेऊन पोलिसांना फोन, तरुणानं कशाचा बदला घेतला?

दवाखान्यात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

वर्धमान शहरातील एका क्लिनिकमध्ये 3 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. येथे राजा भौमिक नावाच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरचा दवाखाना आहे. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दवाखान्यात प्रवेश केला आणि केबिनमध्ये राजा भौमिक यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, डॉ. राजा भौमिक नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी वेळेवर दवाखान्यात आले होते आणि पेशंट तपासत होते. त्याच वेळी आरोपी जीवन रुईदास तिथे पोहोचला आणि संधी मिळताच त्याने धारदार शस्त्राने भौमिक यांच्यावर हल्ला केला. यात भौमिक यांचा जागीच मृत्यू झाला.

आजीच्या उपचारात निष्काळजीपणा

पोलीस चौकशीत जीवन रुईदासने सांगितले की, त्याच्या आजीवर बराच काळ याच डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. सुमारे एक महिन्यापूर्वी त्याच्या आजीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच आजीचा जीव गेला, असा आरोप जीवनने केला आहे. याच रागातून बदला घेण्याच्या हेतूने त्याने डॉक्टरची हत्या केल्याचे मान्य केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp