जुळ्या मुली जन्माला आल्याचा मनात राग, नवऱ्यासह सासऱ्याने सुनेला संपवलं, मन हेलावणारी घटना
Crime news : एका महिलेनं जुळ्या मुलींना जन्म दिल्याने नवऱ्याने आणि सासऱ्याने सुनेची हत्या केली. जिल्हा न्यायालयाने पती आणि सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जुळ्या मुलींना जन्म दिल्याने नवऱ्याने आणि सासऱ्याने सुनेची हत्या केली
संकुचित विचारांमुळे पती आणि सासऱ्यांनी नेहाची हत्या केली
Crime news : एका महिलेनं जुळ्या मुलींना जन्म दिल्याने नवऱ्याने आणि सासऱ्याने सुनेची हत्या केली. जिल्हा न्यायालयाने पती आणि सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्य न्यायालयाने अतिरिक्त जिल्हा आणि रात्र न्यायाधीश रवी रंजन यांनी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून आणि पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर हा एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. ही घटना बिहारच्या पश्चिम पंपारण्या येथील बगाह येथील नगर पोलीस ठाणे परिसरात घडली. मृत बायकोचं नाव नेहा असे आहे.
हे ही वाचा : शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारुन विलिनीकरण करावं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
न्यायालयाने दोषी पती आणि सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली
न्यायालयाने दोषी पती आणि सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी 50 हजार रुपये दंड, ठोठावला. जर दंड न भरल्यास दोघांनाही अतिरिक्त सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल. प्रभारी अतिरिक्त सरकारी वकील प्रभु प्रसाद यांनी ही माहिती दिली. दरम्यान हा खटला 2023 मधील असल्याची माहिती आहे.
नेहाच्या सुरुवातीचा संसाराचा काळ चांगला सुरु होता, परंतु नेहाने जुळ्या मुलींना जन्म दिला तेव्हा तिचा नवरा आणि सासरे संतापले. मुलाने आपल्याच बायकोला त्रास देण्यास सुरुवात केली.
पती आणि सासऱ्याने नेहाची केली हत्या
संबंधित प्रकरणात फिर्यादीच्या म्हणण्यांनुसार, जुळ्या मुलींच्या जन्मामुळे संघर्ष निर्माण झाला. या गैरवर्तन आणि संकुचित विचारांमुळे पती आणि सासऱ्याने नेहाची हत्या केली आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मृत नेहाचे वडील नंद किशोर सोनी यांनी शहर पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केला, नंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला होता.










