पुणे : 40 वर्षीय महिलेनं 25 वर्षाच्या तरुणाला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; 6 वर्षानंतर प्रकरण हाताबाहेर जाताच...नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात प्रियकराच्या छळाला कंटाळून एका महिलेने आपल्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली. 7  जानेवारी रोजी दारु पार्टीच्या बहाण्याने नदीकाठी नेऊन तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. 11 जानेवारी रोजी त्या तरुणाचा मृतदेह सापडला. सीसीटीव्ही, दारुच्या बाटल्या आणि सिगारेटच्या अवशेषांवरून सुगावा घेत पोलिसांनी 20 दिवसांनंतर तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

40 वर्षीय महिलेनं 25 वर्षाच्या तरुणाला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात

point

प्रकरण हाताबाहेर जाताच...नेमकं काय घडलं?

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात प्रियकराच्या छळाला कंटाळून एका महिलेने आपल्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली. 7  जानेवारी रोजी दारु पार्टीच्या बहाण्याने नदीकाठी नेऊन तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. 11 जानेवारी रोजी त्या तरुणाचा मृतदेह सापडला. सीसीटीव्ही, दारुच्या बाटल्या आणि सिगारेटच्या अवशेषांवरून सुगावा घेत पोलिसांनी 20 दिवसांनंतर तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा : रील पोस्ट करण्यासाठी नकार दिला; बायकोने युट्यूब व्हिडीओ पाहिला अन् एका रात्रीत नवऱ्याला संपवलं

मुलाच्या मदतीने काढला प्रियकराचा काटा

मृत तरुणाचे नाव मुंजा धोंडीबा नरहरे (वय 25) असे आहे. त्याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय 40) हिच्याशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंजा उषाला मारहाण करत असे आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून उषा चव्हाणने तिचा मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण (वय 21) याला सर्व हकीकत सांगितली. यानंतर  निखिल आणि उषाने मिळून मुंजाच्या हत्येचा कट रचला. या कटात निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सामील करून घेण्यात आले. 

आधी पार्टी, मग दगडाने ठेचले

7 जानेवारी रोजी उषाने मुंजा नरहरेला चाकणमध्ये भेटायला बोलावले. गंगाखेडवरून चाकणला पोहोचलेल्या मुंजाला निखिल आणि स्वप्नीलने दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिघांनी खराबवाडी येथील दुकानातून दारु विकत घेतली आणि बिरदवाडीजवळील एका निर्जन नदीकाठी जाऊन पार्टी केली. दारु पित असतानाच निखिल आणि स्वप्नीलने मागून मुंजावर शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्याची ओळख पटू नये या उद्देशाने आरोपींनी दगडाने त्याचे तोंड ठेचून विद्रूप केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp