पुढील काळात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी चर्चा होणार आहे का? शरद पवार म्हणाले...

मुंबई तक

Sharad Pawar Press Conference : आज सकाळी (4 फेब्रुवारी) शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु राहणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याविषयी ते म्हणाले की, 'आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत होते. यापेक्षा जास्त काही नव्हते. आम्हा लोकांसमोर संकट आलंय, त्यातून परत उभारणं आणि परस्परांना धीर देणं. पुढे कसं जायचं? याच्यावर आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयासंबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही.'  या पत्रकार परिषदेत शरद पवार अजून काय म्हणाले जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Sharad Pawar
Sharad Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आता पुढे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी चर्चा होणार आहे का?

point

शरद पवार म्हणाले...

Sharad Pawar Press Conference : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानं राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्या यासाठी अजित पवार प्रयत्न करत होते असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे; तर अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचं अजित पवार गटाचे काही प्रमुख नेते सांगत आहेत. याविषयी आज सकाळी (4 फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. दरम्यान, यापुढंही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु राहणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याविषयी ते म्हणाले की, 'आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत होते. यापेक्षा जास्त काही नव्हते. आम्हा लोकांसमोर संकट आलंय, त्यातून परत उभारणं आणि परस्परांना धीर देणं. पुढे कसं जायचं? याच्यावर आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयासंबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही.'  या पत्रकार परिषदेत शरद पवार अजून काय म्हणाले जाणून घेऊया.

हे ही वाचा : फडणवीस म्हणाले, विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर दादांनी मला सांगितलं नसतं का? आता शरद पवारांचं प्रत्युत्तर

फडणवीसांना काय अधिकार?

राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाबद्दल शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उडी घेतली होती. विलिनीकरणाविषयी काही चर्चा झाली असती तर अजितदादांनी मला कल्पन दिली असती असं फडणवीस म्हणाले होते. याविषयी बोलताना पवार म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस हे विलीनि‍करणाच्या चर्चेत कुठंच सहभागी नव्हते. त्यामुळं त्यांना यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे हे मला माहित नाही.'

स्मारकाविषयी माहिती नाही

बारामतीत अजितदादांचे स्मारक होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र याविषयी कोणतीच चर्चा झालेली नसल्याचं सांगत शरद पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 'याविषयी मी वर्तमानपत्रांमध्ये वाचलं. मात्र त्याविषयी काही चर्चा झालेली नाही. ज्या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केली होती त्या संस्थेचा अध्यक्ष  मी आहे. त्यामुळे कमीत कमी मला तरी ठाऊक असायला पाहिजे. याविषयी काय करायचं याविषयी आम्ही सगळे लोक एकत्र बसू. पण असं काही नसताना. चर्चा झालेली नसताना त्यावर भाष्य करणं योग्य नाही.'

हे वाचलं का?

    follow whatsapp