फडणवीस म्हणाले, विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर दादांनी मला सांगितलं नसतं का? आता शरद पवारांचं प्रत्युत्तर
Sharad Pawar on Devendra Fadnavis : "देवेंद्र फडणवीसांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे? समजलं नाही. ते या सगळ्या चर्चेत कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा काय अधिकार आहे? मला माहिती नाही", अशा शब्दात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीस म्हणाले, NCP च्या विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर दादांनी मला सांगितलं असतं,
आता शरद पवारांचं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar on Devendra Fadnavis, बारामती : राष्ट्रवादीचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथील विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी या चर्चांची हवा काढण्याचा प्रयत्न केला होता. "अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते, शिवाय माझ्याशी त्यांचे व्यक्तिगत संबंधही खूप चांगले होते. अजित पवार जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा करत असतील आणि या विलीनीकरणाची तारीखही ठरली असेल तर ते मला सांगणार नाहीत का, किंबहुना विलीनीकरणाची चर्चा भाजपसोबत करणार नाहीत का?", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर खासदार शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बारामतीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांची
"देवेंद्र फडणवीसांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे? समजलं नाही. ते या सगळ्या चर्चेत कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा काय अधिकार आहे? मला माहिती नाही", अशा शब्दात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलंय.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आता चर्चा होणार का?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत होते. यापेक्षा जास्त काही नव्हते. आम्हा लोकांसमोर संकट आलंय, त्यातून परत उभारणं आणि धीर देणं. पुढे कसं जायचं? याच्यावर आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयासंबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाहीत.










