"ऑथेंटिक माहिती नाही तोपर्यंत...", दादांच्या विमान अपघातावर घेण्यात येणाऱ्या शंकांवर शरद पवारांनी मांडली भूमिका

मुंबई तक

Sharad Pawar on Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलंय. ते म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताबाबत मी सुरुवातीलाच बोललोय. पुन्हा काय सांगायचं? जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही, तोपर्यंत मी शंका घेणार नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

Sharad Pawar on Ajit Pawar Plane Crash
Sharad Pawar on Ajit Pawar Plane Crash
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"ऑथेंटिक माहिती नाही तोपर्यंत...",

point

दादांच्या विमान अपघातावर घेण्यात येणाऱ्या शंकांवर शरद पवारांनी मांडली भूमिका

Sharad Pawar on Devendra Fadnavis, बारामती : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथील विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र, अजित पवारांच्या या विमान अपघातात अनेक नेत्यांनी शंका व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी घातपाताची शंका व्यक्त करत 5-6 मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत अजितदादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केलीये. दरम्यान, या सर्व घडामोडींवर खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. 

जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही, तोपर्यंत मी शंका घेणार नाही - शरद पवार 

अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलंय. ते म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताबाबत मी सुरुवातीलाच बोललोय. पुन्हा काय सांगायचं? जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही, तोपर्यंत मी शंका घेणार नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : महाराष्ट्रातल्या 'या' खासदाराला लोकसभेतून केलं निलंबित, राहुल गांधींसाठी सत्ताधाऱ्यांना भिडणारा तो खासदार कोण?

अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यादिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र, शरद पवारांनी हा अपघातचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अमोल मिटकरी आणि संजय राऊतांनी देखील या प्रकरणात मोठ्या शंका उपस्थित केल्या होत्या. धुकं नव्हतं, पायलट का बदलला? मुंबईत अजित पवारांनी प्रवासाला सुरुवात केली त्यावेळीचं सीसीटीव्ही का मिळत नाही? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरांनी उपस्थित केले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp