"ही कुठली पद्धत?", विकास लवांडेंना अटक होताच सुप्रिया सुळे संतापल्या

मुंबई तक

Supriya Sule reaction on Vikas Lawande arrest : राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांना अटक झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

Supriya Sule reaction on Vikas Lawande arrest
Supriya Sule reaction on Vikas Lawande arrest
google news

बातम्या हायलाइट

point

'आधुनिक मंबाजींना माझा वारकरी..',

point

विकास लवांडे यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

Supriya Sule reaction on Vikas Lawande arrest : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, या नाट्यमय कारवाईनंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विकास लवांडे यांच्या अटकेची बातमी समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून पहिली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे की, "वारकऱ्यांचा संस्कार रक्तात, द्वेष पेरू देणार नाही, आधुनिक मंबाजींना माझा वारकरी संप्रदाय घेरू देणार नाही! हल्लेखोर मोकाट आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्या विकास लवांडे ह्यांनाच अटक... निषेध ! निषेध निषेध !" ...विकास लवांडे यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केलंय. 

हेही वाचा :  बायको-लेकरु.., 25 लाख रुपये अन् तिच्या सौंदर्याची मोहिनी, भयंकर प्रकरण! काय घडलं?

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट

"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ( Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar ) प्रवक्ते विकास लवांडे ( Vikas Lawande - विकास लवांडे ) यांना अटक करण्यात आली. या अटकेचा आम्ही निषेध करतो. राज्याचे गृहखाते नेमके कोणत्या दिशेने काम करतेय हा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी ही गेल्या काही दिवसांतील पुणे शहर आणि परिसरातील प्रमुख हिंसक घटनांची ही यादी....गुन्हेगारीबाबत अक्षरशः महाराष्ट्रात पुणे शहराचा पहिला तर भारतात पाचवा क्रमांक लागतो. केंद्र सरकारची आकडेवारीच हे स्पष्टपणे सांगत आहे. दिवसाढवळ्या खून होतात, गॅंगवॉर होते, रस्त्यावर रक्तपात होतो, महिलांवर - चिमुरड्यांवर अत्याचार होतो, राजकीय कार्यकर्त्यांना अटक होते आणि गुंडांना मात्र मोकळे रान मिळते या सर्व गोष्टी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांगायला पुरेशा आहेत.  गृहमंत्री महोदय, जनता प्रश्न विचारतेय की, हिंसेचे हे रक्तरंजीत दुष्टचक्र कधी थांबणार आहे का ? एवढ्या घटना सातत्याने आसपास घडत असताना देखील गृहखाते हाताची घडी, तोंडावर बोट अशा अवस्थेत का बसलंय ? जनतेला उत्तरे हवी आहेत आणि कठोर कृतीदेखील...! जनता दहशतीच्या छायेखाली असताना गृहमंत्रालय मात्र सुस्त आहे. गुन्हेगारांना फ्री हॅंड द्यायचा आणि दुसरीकडे लवांडे यांच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करायची, ही  कुठली पद्धत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनता आपल्याकडून न्याय मागतेय. किमान सुरक्षित वातावरण मागतेय", असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. 

हेही वाचा : मावशीकडे रहायला गेली अन् घडलं नको ते, रक्तस्राव झाल्यामुळे प्रकरण बाहेर; आरोपी कोण?

हे वाचलं का?