भाजपला जमलं नाही, ते कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं! काय घडलं?

मुंबई तक

Cockroach janata party viral trend : सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) नावाचा व्यंगात्मक राजकीय पक्ष प्रचंड व्हायरल झाला असून, इन्स्टाग्रामवर या पार्टीला 10.4m लोकांनी follow केले आहे.

ADVERTISEMENT

Cockroach janata party viral trend
Cockroach janata party viral trend
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपला जमलं नाही, ते कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं!

point

इन्स्टाग्रामवर या पार्टीला 10.4m लोकांनी follow केले

Cockroach janata party viral trend : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर गेल्या 72 तासांपासून 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ट्रेंडिंगवर आली आहे. केवळ 5 दिवसांच्या आत या  व्यंगात्मक राजकीय पक्षाच्या पेजला देशातील 10.4 मिलियनपेक्षा अधिक तरुणांनी फॉलो केले आहे. या पार्टीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजच्या फॉलोअर्सची संख्या 10.4 मिलियनवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या भाजपच्या अधिकृत पेजपेक्षा जास्त झाली आहे. भाजपच्या अधिकृत पेजला फॉलो करणाऱ्यांची संख्या 269k इतकी आहे. त्यामुळे भाजपला जे जमलं नाही, ते कॉकरोच जनता पार्टीने 5 दिवसांत करुन दाखवलं असल्याची चर्चा रंगली आहे. 

मराठी तरुणाने सुरु केली कॉकरोच जनता पार्टी 

या पेजची सुरुवात ३0 वर्षीय अभिजीत दीपके या तरुणाने केली आहे. मूळचा महाराष्ट्रातील  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रहिवासी असलेला अभिजीत दीपके हा एक प्रोफेशनल पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रेटेजिस्ट आहे. अभिजीतने पुणे येथून पत्रकारितेमध्ये (जर्नलिज्म) आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला होता. त्याने अमेरिकेच्या प्रतिष्ठित बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून 'पब्लिक रिलेशंस' (PR) मध्ये मास्टर ऑफ सायन्स (MS) ची पदवी नुकतीच पूर्ण केली आहे.

अभिजीत दीपके याला राजकीय संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा खूप जुना आणि दांडगा अनुभव आहे. वर्ष 2020 ते 2022 दरम्यान तो आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया टीमचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून कार्यरत होता. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान 'आप'च्या बाजूने सोशल मीडियावर जो मीम्सचा महापूर आला था, त्यामागे अभिजीतचेच टॅलेंट असल्याचे मानले जाते. याशिवाय त्याने दिल्लीच्या शिक्षण विभागाचा कम्युनिकेशन्स ॲडव्हायझर म्हणूनही काम केले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संपूर्ण 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिपण्णीमुळे झाली . 15 मे 2026 रोजी  'सिनिअर अॅडव्होकेट' म्हणून मान्यता मिळण्यासंबंधीच्या वकिलाच्या एका याचिकेसंदर्भात बोलताना न्यायमूर्तींकडून ही टिप्पणी करण्यात आली होती.  संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी कथितरित्या टिप्पणी केली होती की,"काही बेरोजगार लोक कॉकरोचप्रमाणे लॉ, मीडिया आणि आरटीआय ॲक्टिव्हिझमसारख्या प्रणालीमध्ये घुसतात आणि व्यवस्थेवर हल्ला करतात."

हे वाचलं का?