महाराष्ट्रातल्या 'या' खासदाराला लोकसभेतून केलं निलंबित, राहुल गांधींसाठी सत्ताधाऱ्यांना भिडणारा तो खासदार कोण?

मुंबई तक

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना भारत-चीन डोकलाम वादाबाबत बोलण्यास रोखण्यात आल्यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी सभागृहात गोंधळ केला. ज्यामुळे 9 खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मागील दोन दिवसांपासून वेगळ्याच कारणाने गाजत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कालपासून (2 फेब्रुवारी) सतत भारत-चीनमधील डोकलाम वादाबाबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. माजी लष्करप्रमुख यांच्या पुस्तकातील काही भाग हा एका मासिकाने प्रकाशित केला होता. ज्याचा संदर्भ देत राहुल गांधी हे देशांतर्गत सुरक्षेबाबत बोलू इच्छित होते. काल त्यांना या विषयावर बोलण्यापासून रोखण्यात आलं. तर आज देखील त्यांना याच विषयावर बोलता येणार नाही असं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं. ज्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी वेलमध्ये उतरून बराच गदारोळ केला. ज्यानंतर विरोधी पक्षातील 9 खासदारांचं निलंबन केलं. ज्यामध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे. 

राहुल गांधींसाठी सत्ताधाऱ्यांना भिडलेल्या महाराष्ट्रातील खासदाराचं निलंबन

राहुल गांधींना बोलू न दिल्याने विरोधकांनी गोंधळ सुरू केला होता. ज्यावेळी काही सदस्यांनी कागदं लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले होते. त्यामुळे सुरुवातील सभागृह हे तासाभरासाठी स्थगित करण्यात आलं होतं. पण नंतर सभागृह सुरू होताच तब्बल 9 खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला. जो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. ज्या 9 खासदारांचे निलंबन करण्यात आले त्यात महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा>> राहुल गांधींना सलग दुसऱ्या दिवशीही 'त्यावर' बोलू दिलं नाही! लोकसभेतील नेमका गोंधळ काय?

लोकसभेत राहुल गांधींना भारत-चीनच्या सीमारेषेवरील वादावर बोलू दिलं जावं यासाठी काँग्रेस खासदार हे सातत्याने विधानसभा अध्यक्षांकडे मागणी करत होते. मात्र, नियमांचा दाखला देत राहुल गांधींना त्यापासून रोखलं जात होतं. अशावेळी जेव्हा तालिका अध्यक्षांनी राहुल गांधींऐवजी दुसऱ्या सदस्यांची नाव पुकारण्यास सुरुवात केली तेव्हा काँग्रेस खासदार अधिकच आक्रमक झाले. ज्यांनी थेट वेलमध्ये कागदं अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. ज्यामुळे 9 खासदारांचं निलंबन करण्यात आलं.

कोणकोणत्या खासदारांना करण्यात आलं निलंबित?

  1. अरविंद सिंह
  2. अमरेंद्र सिंह
  3. गुरुदीप सिंह ओझोला
  4. हिबी इडेन
  5. दीन कुरिया कोत्झी
  6. प्रशांत पडोळे
  7. किरणकुमार रेड्डी
  8. एस. व्यंकटरमण
  9. मणिकम टागोर

या खासदारांचं उर्वरित संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp