रणवीर सिंगला 'तो' निर्णय पडला महागात, FWICE ने घातली बंदी, आता पहिली प्रतिक्रियाही समोर
Ranveer Singh : 'डॉन 3' चित्रपटामधून अचानक बाहेर पडल्यामुळे अभिनेता रणवीर सिंगवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला आहे. या वादावर प्रतिक्रिया देत रणवीर सिंगने संयम राखत आपण या विषयावर जाहीर चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रणवीर सिंगला 'तो' निर्णय पडला महागात
FWICE ने घातली बंदी, आता पहिली प्रतिक्रियाही समोर
Ranveer Singh : 'डॉन 3' या अत्यंत बहुप्रतिक्षित चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंगने अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चित्रपटसृष्टीत नवा वादंग निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेता, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीर सिंगविरुद्ध बंदीचा ठराव मंजूर केला आहे. फेडरेशनने संपूर्ण चित्रपटसृष्टीला रणवीर सिंगसोबत काम न करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा : बायकोला प्रेयसीच्या घरी नेलं, अन् सासऱ्यांना सांगितली 'ती' गोष्ट, भयंकर कांड उघडकीस
निर्मात्यांकडून 40 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने, रणवीर सिंगने शूटिंग सुरू होण्यापूर्वी केवळ 10 दिवस आधी प्रकल्प सोडून निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप केला आहे. निर्मात्यांनी 40 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली असून, रणवीरने अद्याप ती भरलेली नाही. दुसरीकडे, रणवीर सिंगचे म्हणणे आहे की, निर्मात्यांच्या बाजूने कामात विलंब होत होता आणि तो स्क्रिप्टवरही समाधानी नव्हता.
हेही वाचा : तरुणीशी शरीरसंबंध ठेवत बनवले अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल करत.. लाज आणणारी घटना









