Personal Finance: मुंबईत घर घेण्यासाठी कसा असला पाहिजे 5 वर्षांचा Golden Financial Plan?

रोहित गोळे

Mumbai Home: मुंबईत घर घेण्यासाठी 5 वर्षांचा Financial Plan कसा तयार करायचा? जाणून घ्या. Down Payment, Home Loan EMI, Emergency Fund आणि अतिरिक्त खर्चाचं नियोजनाविषयी सविस्तर.

ADVERTISEMENT

personal finance mumbai home buying 5 year financial plan
Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
Google CTA

Personal Finance Mumbai Home: मुंबईत घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं; पण घराच्या किंमतीसोबत Down Payment, Home Loan EMI, Stamp Duty, Registration आणि इतर खर्च यांचं योग्य नियोजन न केल्यास बजेट कोलमडू शकतं. त्यामुळे घर खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी किमान 5 वर्षांचा Financial Plan तयार करणं फायदेशीर ठरतं. घराच्या किमतीव्यतिरिक्त व्यवहारात अनेक अतिरिक्त खर्च येतात.

1. पहिलं वर्ष: आर्थिक स्थिती तपासा

सर्वप्रथम तुमचं मासिक उत्पन्न, खर्च, विद्यमान कर्ज आणि बचत यांचा आढावा घ्या. Credit Score सुधारण्यावर लक्ष द्या आणि किमान 6 महिन्यांच्या खर्चाएवढा Emergency Fund तयार करा.

2. दुसरं वर्ष: Down Payment साठी बचत

तुम्हाला किती किंमतीचं घर घ्यायचं आहे हे ठरवा. त्यानुसार Down Payment चे लक्ष्य निश्चित करा. दरमहा ठराविक रक्कम SIP, RD किंवा इतर योग्य साधनांमध्ये शिस्तबद्धपणे बाजूला काढा. मात्र घरखरेदीची तारीख जवळ आल्यावर जोखीम कमी करण्याचा विचार करा.

3. तिसरं वर्ष: Home Loan क्षमता तपासा

तुमच्या उत्पन्नावर किती EMI परवडेल हे ठरवा. बँक किती कर्ज देईल यापेक्षा तुमच्या मासिक बजेटला किती EMI सुरक्षित आहे, याला प्राधान्य द्या. भविष्यातील पगारवाढ गृहीत धरून अतिशय मोठं कर्ज घेणं टाळा.