'अल निनो'नंतर आता या Typhoon Dolphin चं टेन्शन, पाऊस थांबणार की धो-धो कोसळणार?

मुंबई तक

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता का निर्माण झाली? कमी दाबाचं क्षेत्र, नैऋत्य मोसमी वारे आणि Typhoon Dolphinचा मान्सूनवर होणारा अप्रत्यक्ष परिणाम जाणून घ्या.

ADVERTISEMENT

maharashtra weather rain alert 13 august and next 3 days typhoon dolphin mumbai
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

मुंबई: महाराष्ट्रात जुलैच्या अखेरीस झालेल्या अति मुसळधार पावसानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मात्र, आता पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामागे बंगालच्या उपसागरातील बदलती हवामानस्थिती, मध्य प्रदेश-राजस्थान परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून सक्रिय असलेले नैऋत्य मोसमी वारे ही प्रमुख कारणं आहेत.

नेमकं काय बदललं?

बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ओडिशासह पूर्व भारतातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश आणि राजस्थान परिसरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवत आहे.

हे ही वाचा>> कल्याणमध्ये कुत्र्यांचा कहर! 24 तासांत तब्बल 161 जणांना चावा, KDMC चा संतापजनक कारभार

अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे (Southwest Monsoon Winds) सक्रिय असल्याने मध्य महाराष्ट्रातील पावसाला चालना मिळत आहे. विशेषतः घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

13 ते 15 ऑगस्टदरम्यान कुठे पाऊस?

13 ऑगस्ट: गोंदिया, गडचिरोली, नाशिक घाट, ठाणे, पुणे घाट, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट परिसरात यलो अलर्ट. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.