मुंबईची खबर : मुंबईच्या तलावांतील पाणीसाठा घटला, 'या' तलावात सर्वात कमी पाणी

मुंबई तक

मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात घट होताना पहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Water Supply
Mumbai Water Supply
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या तलावांतील पाणीसाठा घटला

point

'या' तलावात सर्वात कमी पाणी

point

मुंबईकरांची काळजी वाढली

Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. एकीकडे ऑक्टोबर हिटचं संकट डोक्यावर असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्यात घट होताना दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (4 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये 95.50 टक्के पाणीसाठा आहे. आदल्या दिवशी हा पाणीसाठा 95.84 टक्के इतका नोंदवला गेला होता. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत किती  पाणीसाठा?

मुंबईतून नैऋत्य मान्सूनचा प्रवास नेहमीच्या वेळेपेक्षा पाच दिवस आधीच, म्हणजे शनिवारी पूर्ण झाला असून, त्यानंतर तलावांमधील पाणीपातळीत ही घट दिसून आली आहे. या मान्सून हंगामात मुंबई शहरात सरासरीपेक्षा 7 टक्के कमी, तर मुंबई उपनगरांमध्ये 9 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या 95.50 टक्के पाणीसाठ्याची तुलना केल्यास, हा साठा मागील दोन वर्षांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2025 रोजी तलावांमध्ये 99.10 टक्के, तर 2024 मधील याच दिवशी 99.42 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

हे ही वाचा : 'तुम्हाला सत्ता मिळाल्याचा राग नाही, पण...' राज ठाकरेंची तोफ धडाडली, थेट भाजपच्या माजी मंत्र्याची 'ती' गोष्ट सांगितली!

सर्वात कमी पाणी 'या' तलावात

सात तलावांपैकी मोडक सागर तलावामध्ये सर्वात कमी म्हणजे अवघा 75.19 टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. त्यापाठोपाठ तानसा तलावात 93.91 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अप्पर वैतरणा तलावामध्ये 96.60 टक्के, तर मिडल वैतरणा तलावामध्ये 99.60 टक्के पाणीपातळी आहे. मुंबईचा प्रमुख स्रोत असलेल्या भातसा तलावामध्ये 97.82 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंनी भरसभेत भाजपच्या मतांची काढली आकडेवारी, सहा महिन्यात 'एवढी' मते

मुंबईकरांची काळजी वाढली

तर दुसरीकडे, मुंबई शहरातील विहार तलाव 100 टक्के भरला असून तुळशी तलावामध्ये 98.12 टक्के पाणीपातळी नोंदवली गेली आहे. मान्सूनच्या लवकर परतल्यामुळे आणि तलावांतील घटलेल्या पाणीसाठ्यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तलावांतील पाणीपातळीवर बारीक लक्ष आहे. यामुळे मुंबईकरांना आता पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे झाले आहे.