राज ठाकरेंनी भरसभेत भाजपच्या मतांची काढली आकडेवारी, सहा महिन्यात 'एवढी' मते

मुंबई तक

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील गर्जना मोर्चातून निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एवढंच नाहीतर त्यांनी पुढे भाजपला 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या मतांची आकडेवारी भरसभेत वाचून दाखवली. 

ADVERTISEMENT

Raj thackeray (AI Photo)
Raj thackeray (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणूक 2024 चा दाखला देत राज ठाकरेंनी काढली आकडेवारी 

point

सहा महिन्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 कोटी 16 लाख 16 हजार मते

Raj Thackeray : "मी तेव्हा ममता बॅनर्जी, सोनिया गांधींसह इतर नेत्यांना सांगितलं होतं, की निवडणुकीवर बहिष्कार टाकावा. त्याशिवाय दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार नाही. अशा प्रकारे मतं कमी होऊ शकत नाहीत आणि भाजपाची मतं अशी वाढू शकत नाहीत. 2017 ते 18 पासून सांगतो की, मतांमध्ये चोऱ्या सुरू आहेत," असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील गर्जना मोर्चातून निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एवढंच नाहीतर त्यांनी पुढे भाजपला 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या मतांची आकडेवारी भरसभेत वाचून दाखवली. 

हे ही वाचा : ठाकरेंचा 'गर्जना मोर्चा' सुरू होण्याआधीच सगळ्यात मोठी आणि इंटरेस्टिंग बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच नाही घडलं!

विधानसभा निवडणूक 2024 चा दाखला देत राज ठाकरेंनी काढली आकडेवारी 

"महाराष्ट्रात नुकतीच 2024 ची विधानसभेची निवडणूक झाली होती. संपूर्ण बहूमत शिंदेंसह भाजपला मिळालं होतं आणि राज्यात संपूर्ण सन्नाटा होता. असा नेमका कोणता विजय असू शकतो. विजय होऊनही लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नव्हता. 2024 च्या लोकसभा मतदानानंतर त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 40 ते 60 लाख मतदार वाढवण्यात आले होते. एवढी संख्या कशी काय वाढू शकते?", असे राज ठाकरे म्हणाले होते.  

सहा महिन्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 कोटी 16 लाख 16 हजार मते

त्यानंतर ते पुढे म्हणाले की, "लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला 2 कोटी 44 लाख 27 हजार मतं मिळाली होती. तेच सहा महिन्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 कोटी 16 लाख 16 हजार मते पडली होती. एवढी मते कशी वाढली? असा प्रश्न राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला'. 

"मला सत्ताधाऱ्यांना सांगायचं की, तुम्ही सत्तेत बसलाय याचा आम्हाला राग नाहीये, पण तुम्ही ज्या पद्धतीने सत्ता राबवताय आणि कशातून राबवता? त्यावरून राग आहे. या देशातील मतदारांनी ठरवलं पाहिजे कोणाला सत्तेवर ठेवायचं, निवडणूक आयोगाने ठरवू नये. एकाच उद्योगपतींना जंगलं देऊन टाकायची, एकाच उद्योगपतींना जमिनी देऊन टाकायच्या. एकाचत उद्योगपतींना पोर्ट द्यायचे. हे येतं कुठून? आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. हेच येतं कुठून? तर हे निवडणूक आयोगामुळे येतं", असे राज ठाकरे म्हणाले.