ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज ठाकरे बंधूंचा एल्गार! राज-उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईत महामोर्चा

मुंबई तक

मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या मोर्चात विविध विरोधी पक्ष सहभागी होणार असून मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ त्याची सांगता होणार आहे.

ADVERTISEMENT

raj thackeray uddhav thackeray mumbai march demand gyanesh kumar resignation
राज आण उद्धव ठाकरेंचा मुंबईत महामोर्चा
Google CTA

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत राजकीय शक्तिप्रदर्शन होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

या मोर्चाला सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ मोर्चाची सांगता होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे.

राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकाच मंचावर

या मोर्च्याचे सर्वात मोठे राजकीय वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकाच आंदोलनात सहभागी होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही ठाकरे नेते पुन्हा एका मुद्द्यावर एकत्र आल्याने या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) यांच्यासह इतर विरोधी पक्षही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील हा मोर्चा केवळ एका पक्षाचे आंदोलन न राहता विरोधकांच्या व्यापक शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप घेण्याची शक्यता आहे.