विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, पुण्यातून कोणाला संधी?
BJP Candidates list for Maharashtra Vidhan Parishad elections : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पुणे आणि नागपूर पदवीधर तसेच पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर
पाहा कोणा-कोणाला दिली संधी?
BJP Candidates list for Maharashtra Vidhan Parishad elections : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 मधील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे हे भाजपचे उमेदवार असतील. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने तीन मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत.
