आधी आंतरजातीय विवाह, मग महिलेचे अनैतिक संबंध; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
Nagpur Crime News : पत्नीच्या कथित संबंधांवरून झालेल्या वादानंतर नागपुरात तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात फरार असलेल्या 29 वर्षीय महिलेला दीड महिन्यानंतर ठाण्यात अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी आंतरजातीय विवाह, मग महिलेचे अनैतिक संबंध
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
Nagpur Crime News : नागपूरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून झालेल्या वादाने गंभीर वळण घेतलं आणि एका तरुणाचा जीव गेला. पतीला पत्नीच्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच्या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर हा वाद वाढत गेला अन् पतीची हत्या झाली. या प्रकरणानंतर फरार झालेल्या 29 वर्षीय महिलेला तब्बल दीड महिन्यानंतर ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान तिने या प्रकरणातील आपल्या भूमिकेची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटकेनंतर तिला पुढील कारवाईसाठी नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
हेही वाचा : 'मेक इन इंडियाच्या नावाखाली हुकूमशाह...' उद्धव ठाकरेंची सडकून टीका, मोदींना काय म्हणाले?
दीपालीने पतीचं घर सोडलं पण वाद सुरुच राहिला
अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव दीपाली उर्फ बाली विजय साळुंके असं आहे. तिचा पती गौरव रागडे हे नागपूरच्या अजनी परिसरातील 27 वर्षीय ऑटोरिक्षाचालक होते. पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव यांना दीपालीचे ऋषिकेश खोडे यांच्यासोबत कथित संबंध असल्याची माहिती मिळाली होती. यावरून दोघांमध्ये वैवाहिक वाद सुरू झाला होता. घटनेच्या सुमारे आठ महिने आधी दीपाली आणि गौरव यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यानंतर दीपालीने गौरव यांचं घर सोडलं आणि ती वेगळी राहू लागली होती.
हेही वाचा : 'मेक इन इंडियाच्या नावाखाली हुकूमशाह...' उद्धव ठाकरेंची सडकून टीका, मोदींना काय म्हणाले?
