पुणे: मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद... जिवलग मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला, CCTV फुटेज समोर

मुंबई तक

मैत्रिणीला फोन करण्याच्या वादातून दोन जिवलग मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचा शेवट थेट कोयत्याच्या हल्ल्यात झाला. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणाचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

ADVERTISEMENT

जिवलग मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला
जिवलग मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला
google news

बातम्या हायलाइट

point

मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद...

point

जिवलग मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला

point

पुण्यातील धक्कादायक प्रकरण

पुणे: मैत्रिणीला फोन करण्याच्या वादातून दोन जिवलग मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचा शेवट थेट कोयत्याच्या हल्ल्यात झाला. वृत्तानुसार, आरोपी तरुणाने त्याच्या मित्रावर कोयत्याने सपासप वार केले. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणाचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. 

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

संबंधित घटना ही 2 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात उसाच्या गाडीजवळ घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

हे ही वाचा: 'कोरियन गेम'चा शेवटचा टास्क... प्राचीची कमांड अन् तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला!

जुन्या मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद... 

घटनेच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास दोघेही भारती विद्यापीठ परिसरात उभे राहून एकमेकांशी गप्पा मारत होते. यावेळी जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला आणि त्या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद काही वेळातच टोकाला गेला. रागाच्या भरात आदित्य कांबळे याने त्याचा मित्र चेतन चव्हाण (वय 23) याच्यावर थेट कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चेतन चव्हाण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

हे ही वाचा: "ऑथेंटिक माहिती नाही तोपर्यंत...", दादांच्या विमान अपघातावर घेण्यात येणाऱ्या शंकांवर शरद पवारांनी मांडली भूमिका

सीसीटीव्ही फुटेज आलं समोर 

या थरारक घटनेनंतर, गंभीरिरत्या जखमी झालेल्या चेतनला तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत असल्याची माहिती आहे.
 

हे वाचलं का?