बार्शी : प्रेमविवाह अन् सोनेरी स्वप्न, पण बिअर बारसमोर संसाराची राखरांगोळी!
Barshi Crime News : बार्शीतील गाडेगाव रोड परिसरात पतीने पत्नीची चाकूचे 50 वार करुन हत्या केली आहे. या क्रूर हिंसेमागील धक्कादायक कारणही समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बार्शी : प्रेमविवाह अन् सोनेरी स्वप्न
पण बिअर बारसमोर संसाराची राखरांगोळी!
Barshi Crime News, विजय बाबर : सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील (Barshi Crime News) गाडेगाव रोड परिसरात सोमवारी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. धनश्री पाटील असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. तर पती ऋषिकेश पाटील हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झालाय.
हेही वाचा : समजून घ्या: कच्चं तेल स्वस्त झालं तरीही पेट्रोल-डिझेल का महाग... सरकार का करतंय असं?
ऋषिकेशचे धनश्रीवर 50 वार, बिअर बारसमोर क्रूर हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी बार्शी-परंडा रोडवरील एका बिअर बारसमोर धनश्री यांना अडवून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आरोपीने तब्बल 50 वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे दोघांनी प्रेम विवाह करुन सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. मात्र, प्रेमाची जागा संशयाने घेतली. नवरा संशयातून इतका क्रूर बनला की त्याने बायकोला भर रस्त्यात क्रूरपणे संपवलंय. (Barshi Crime News)
हेही वाचा : मुंबई : मरिन ड्राईव्हवर थरार, गाडी थांबवण्याचा इशारा पण मर्सिडिजने दोन पोलिसांना चिरडलं!









