महाराष्ट्रात चाललंय तरी काय? कारागृह प्रशासन अधिकाऱ्याची आरोपीसोबत दारू पार्टी? VIDEO
Nashik Road jail news : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तीन अधिकाऱ्यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीसोबत मद्यपान पार्टी केल्याचा आरोप झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत वरिष्ठ प्रशासनाने सखोल चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा एक व्हिडीओही व्हायरल झालाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात चाललंय तरी काय?
कारागृह प्रशासन अधिकाऱ्याची आरोपीसोबत दारू पार्टी? VIDEO
Nashik Road Central Jail viral video: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृह प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून चक्क एका संशयित आरोपीसोबत मद्यपान पार्टी केल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणामुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांची वर्तणूक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या एका संशयितासोबत कारागृहातील तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही पार्टी केल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकार कारागृह अधिकाऱ्यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेरील परिसरात घडला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे.
हेही वाचा : महागाईचा भडका, 10 दिवसात पेट्रोल-डिझेल 7 रुपयांनी महागलं; पाहा लेटेस्ट किंमती
व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून नाशिकरोड कारागृह प्रशासन हादरून गेले आहे. या व्हिडिओमध्ये कारागृह अधिकारी आणि फसवणूक प्रकरणातील आरोपी एकत्र बसून मद्यपान करताना दिसत असल्याचा आरोप केला जातोय, ज्यामुळे नाशिक पोलीस दलात आणि सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हे अधिकारी आणि तो संशयित आरोपी यांच्यातील संबंध नेमके काय आहेत? याबाबत आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. माहिती मिळताच वरिष्ठ कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, संबंधित तीनही अधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तणुकीची चौकशी सुरू केली आहे. हा व्हिडिओ खरोखरच कारागृह परिसरातील आहे का आणि त्यामध्ये दिसणारे अधिकारी कोण आहेत, याची पडताळणी प्रशासनाकडून केली जात आहे.
कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह
कारागृहासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची वर्तणूक होणे हे प्रशासकीय शिस्तीचे उल्लंघन मानले जात आहे. आरोपीला सुधारण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारीच जेव्हा आरोपीसोबत सख्य वाढवतात, तेव्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. चौकशीदरम्यान जर हे अधिकारी दोषी आढळले, तर त्यांच्यावर निलंबनाची किंवा कठोर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या घटनेने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि नैतिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला असून, या प्रकरणातील सत्य बाहेर येणे गरजेचे झाले आहे.









