महागाईचा भडका, 10 दिवसात पेट्रोल-डिझेल 7 रुपयांनी महागलं; पाहा लेटेस्ट किंमती
Petrol diesel price hike : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेला मोठा फटका बसला असून, अवघ्या 10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महागाईचा भडका, 10 दिवसात पेट्रोल-डिझेल 7 रुपयांनी महागलं
पाहा लेटेस्ट किंमती
Petrol diesel price hike : आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सर्वसामान्यांना दणका देणाऱ्या बातमीने झाली आहे.. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी चौथ्यांदा इंधनाचे दर वाढवून सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. चार वर्षांपासून किमती स्थिर ठेवल्यानंतर, 15 मे रोजी अचानक इंधनाचे दर वाढवण्यात आले होते आणि तेव्हापासून सुरू झालेली हा दरवाढीची मालिका अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत चार वेळा केलेल्या वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 7 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत.
हेही वाचा : कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या; राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूला कुणी संपवले?
एकाच झटक्यात मोठी दरवाढ
सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत 2.61 रुपये आणि डिझेलच्या किमतीत 2.71 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर आता राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत प्रति लिटर 95.20 रुपये आणि पेट्रोलची किंमत 102.12 रुपये प्रति लिटर झाली आहे. गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी एकदम मोठी दरवाढ करण्याऐवजी 2022 मधील मार्च-एप्रिल महिन्याप्रमाणेच टप्प्याटप्प्याने दर वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे. 15 मे रोजी 3 रुपये, त्यानंतर 19 मे रोजी 90 पैसे आणि 23 मे रोजी पुन्हा पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महाग झाले होते. आता सोमवार, 25 मे रोजी इंधनाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांहून अधिक वाढ करून चौथा मोठा झटका देण्यात आला आहे.
हेही वाचा : काकी अन् पुतण्यानं मिळून काकाला संपवले, कारण वाचून हादरुन जाल
देशभरातील विविध शहरांमधील इंधनाचे दर
दरवाढीनंतर आता दिल्लीत पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेली आहे. केवळ दिल्लीच नाही, तर इतर प्रमुख शहरांमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. कोलकातामध्ये आता पेट्रोल 113.51 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 111.21 रुपये तर डिझेलचा दर 97.83 रुपये प्रति लिटर झाला आहे. तसेच चेन्नईमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 107.77 रुपये आणि डिझेलसाठी 99.55 रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढून दैनंदिन जीवनावरील महागाईचा दबाव अधिकच वाढत आहे.









