काकी अन् पुतण्यानं मिळून काकाला संपवले, कारण वाचून हादरुन जाल

मुंबई तक

एका तीस वर्षीय तरुणाच्या निर्घृणपणे करण्यात आलेल्या हत्येने चांगलीच खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे त्याची बायको, मेहुणी आणि दोघींच्या प्रियकरांनी मिळून त्याला संपवलं.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

काकी अन् पुतण्यानं मिळून काकाला संपवले

point

कारण वाचून हादरुन जाल

Crime News : एका तीस वर्षीय तरुणाच्या निर्घृणपणे करण्यात आलेल्या हत्येने चांगलीच खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे त्याची बायको, मेहुणी आणि दोघींच्या प्रियकरांनी मिळून त्याला संपवलं. या हत्येनंतर त्यांनी आत्महत्येचा बनाव रचला. मात्र पोस्ट मार्टममधून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी आधी तरुणाला घरात ओलीस ठेवले, त्यानंतर त्याला विजेचे झटके दिले आणि शेवटी बळजबरीने विष पाजून त्याला संपवले. ही घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील असून, पवन कुमार ठाकूर (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

पुतण्यावरच जडला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभल येथील रहिवासी असलेल्या आंचलचा विवाह ६ वर्षांपूर्वी पवन कुमार ठाकूरसोबत झाला होता आणि त्यांना दोन वर्षांची एक मुलगीही आहे. काही काळापूर्वी पवन गावात राहत असताना, त्याच्या चुलत भावाचा मुलगा अंकित याचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. याच दरम्यान आंचल आणि अंकित यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पवनला जेव्हा या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली, तेव्हा वाद टाळण्यासाठी तो गाव सोडून कुंदनपूर येथे राहू लागला. मात्र, तरीही आंचलने अंकितसोबतचे आपले संबंध सुरूच ठेवले. दरम्यानच्या काळात आंचलची बहीण शिखा हिची मैत्रीही जयंतलपूर येथील अजय दिवाकर याच्याशी झाली आणि दोन्ही बहिणींनी मिळून पवनला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला.

हे ही वाचा :  नर्सचा मर्डर करुन बॉडी रुग्णालयात आणून टाकली, सुफियानच्या एका हट्टामुळे भयंकर घडलं!

आधी करंट दिला आणि नंतर पाजले विष

गेल्या शुक्रवारी संध्याकाळी पवन जेव्हा आपली ड्युटी संपवून घरी परतला, तेव्हा आंचलने मुद्दाम त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढवून आंचल आणि शिखा या दोन्ही बहिणींनी पवनला दोरीने बांधले आणि फोन करून आपापल्या प्रियकरांना घरी बोलावून घेतले. यानंतर या चौघांनी मिळून आधी पवनला विजेच्या तारांनी करंट दिला आणि नंतर त्याच्या तोंडात बळजबरीने विष पाजले. पोलीस चौकशीत समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा पवन वेदनेने तडफडत होता, तेव्हा हे चारही आरोपी त्याच घरात बसून पार्टी करत होते. 

हे ही वाचा : प्रशिक्षकाने खोलीत बोलावलं अन्.., 17 वर्षीय बॉक्सरसोबत काय घडलं?

पोलिसी खाक्या दाखवताच...

आंचलने पवनच्या बहिणींना फोन करून सांगितले की, पवनने काहीतरी विषारी पदार्थ खाल्ला आहे. नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर आंचलने पवनच्या पोस्ट मार्टमला कडाडून विरोध केला, ज्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. शनिवारी संध्याकाळी आलेल्या पोस्टामॉर्टम अहवालात पवनच्या शरीरावर विजेच्या करंटचे चट्टे आणि विषबाधा झाल्याची पुष्टी झाली. यानंतर आंचलला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी पत्नी आंचल, तिची बहीण शिखा आणि त्यांचे प्रियकर अंकित व अजय दिवाकर या चौघांना अटक करून तुरुंगात पाठवले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 

हे वाचलं का?