नर्सचा मर्डर करुन बॉडी रुग्णालयात आणून टाकली, सुफियानच्या एका हट्टामुळे भयंकर घडलं!
Crime News : धर्मांतरासाठी दबाव टाकून एका नर्सची गळा आवळून हत्या करण्यात आली. आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचून मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये सोडला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नर्सचा मर्डर करुन बॉडी रुग्णालयात आणून टाकली
सुफियानने असं का केलं?
Crime News : एका नर्सची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत नर्सला मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वार्डमध्ये एका अज्ञात महिलेने आणून सोडले होते. संबंधित महिलेने नर्सला तेथे सोडून तात्काळ घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना पाहून तिथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने डॉक्टरांना पाचारण केले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी नर्सला मृत घोषित केले. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृतदेह सोडून पळ काढणाऱ्या महिलेच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा : बीड : विवाह सोहळ्यात फटाक्यांचा भीषण स्फोट, क्षणात झालं होत्याचं नव्हतं
प्रेमप्रकरण आणि धर्मांतराचा दबाव
पोलीस तपासात या हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारणे समोर आली आहेत. मुख्य आरोपी सुफियान याने मृत नर्सला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले होते आणि तिच्यावर सातत्याने धर्मांतर करून लग्नासाठी दबाव टाकला जात होता. मात्र, नर्सने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता. या नकाराचा राग मनात धरून आरोपीने अत्यंत क्रूरतेने तिचा गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हत्येनंतर, हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव रचण्यासाठी आरोपींनी मृतदेहाला ई-रिक्षातून मेडिकल कॉलेजच्या आवारात नेऊन सोडले होते. मृत नर्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिचे 2014 मध्ये लग्न झाले होते आणि तिला चार वर्षांचा मुलगाही आहे, परंतु पतीसोबतच्या वादामुळे ती वेगळी राहत होती.
हेही वाचा : विद्यार्थिनीला हॉटेलवर नेलं, भांगेत कुंकू भरलं अन् नको तेच.. अश्लील Video व्हायरल









