बीड : विवाह सोहळ्यात फटाक्यांचा भीषण स्फोट, क्षणात झालं होत्याचं नव्हतं

मुंबई तक

लग्नकार्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीदरम्यान एक दारूगोळा थेट फोटोग्राफरच्या अंगावर येऊन पडला आणि त्याचा मोठा स्फोट झाला. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात आणि ड्रोन व्हिडिओमध्ये कैद झाला असून, याचे अत्यंत धक्कादायक व्हिडिओ आता समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

Beed News
Beed News
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : विवाह सोहळ्यात फटाक्यांचा भीषण स्फोट,

point

क्षणात झालं होत्याचं नव्हतं;

point

पाच फोटोग्राफर्स अन्...

Beed News, योगेश  काशीद : बीड शहरात एका शाही विवाह सोहळ्या दरम्यान फटाक्यांचा जमिनीवर भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी अपघातात तब्बल पाच फोटोग्राफर गंभीररित्या जखमी झाले आहेत. लग्नकार्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीदरम्यान एक दारूगोळा थेट फोटोग्राफरच्या अंगावर येऊन पडला आणि त्याचा मोठा स्फोट झाला. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात आणि ड्रोन व्हिडिओमध्ये कैद झाला असून, याचे अत्यंत धक्कादायक व्हिडिओ आता समोर आले आहेत.

तीन दिवसानंतर होणार होता विवाह, मात्र...

या भीषण अपघातात जखमी झालेल्यांमध्ये अभिषेक कदम नावाच्या एका तरुण फोटोग्राफरचा समावेश आहे. या स्फोटात अभिषेकचा चेहरा, डोळे आणि शरीर गंभीररित्या भाजले आहे. अत्यंत वेदनादायक बाब म्हणजे, या घटनेच्या अवघ्या तीन दिवसांवर अभिषेकचा स्वतःचा विवाह सोहळा येऊन ठेपला होता. मात्र, या अनपेक्षित अपघातामुळे आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत चेहऱ्याला पट्ट्या बांधून अभिषेकचा विवाह लावण्याची दुर्दैवी वेळ त्याच्या कुटुंबावर आली.

हे ही वाचा : जावयाने व्यक्त केली 'ती' इच्छा, संतापलेल्या सासूने थेट शेवटच केला

घटनेचे भयानक व्हिडिओ समोर

या संपूर्ण गंभीर घटनाक्रमानंतर जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबाने प्रशासनाकडे धाव घेतली आहे. पीडित कुटुंबाने बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना एक मागणीचे निवेदन सुपूर्द केले. या अपघातानंतरच ही संपूर्ण घटना आणि त्यावेळचे भयावह व्हिडिओ उघडकीस आले आहेत. निष्पाप फोटोग्राफर्सच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

हे ही वाचा : विद्यार्थिनीला हॉटेलवर नेलं, भांगेत कुंकू भरलं अन् नको तेच.. अश्लील Video व्हायरल

कुटुंबीयांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

संबंधित लग्न सोहळ्याचे आयोजक, इव्हेंट मॅनेजर आणि फायर वर्क्स चालक यांच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडला आहे. या सर्वांवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, अशी मागणी जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

हे वाचलं का?