जावयाने व्यक्त केली 'ती' इच्छा, संतापलेल्या सासूने थेट शेवटच केला
सासरवाडीत एका जावयाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सासूने घरातील इतर महिलांसोबत मिळून ही हत्या केली. यामागे नेमकं कारण काय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जावयाने व्यक्त केली 'ती' इच्छा
संतापलेल्या सासूने थेट शेवटच केला
Crime News : बिहारमधील जमुई येथून कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काला गावात सासरच्या घरी राहणाऱ्या 35 वर्षीय जितेंद्र पंडित या जावयाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. जितेंद्रचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या लोकांनी कोणालाही माहिती न देता घराच्या पाठीमागे सुमारे तीन फूट खोल खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरून टाकला. इतकेच नव्हे तर मृतदेह लवकर कुजण्यासाठी त्या खड्ड्यात तब्बल 15 पाकिटे मीठही टाकण्यात आले. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी (22 मे) घटनास्थळी पोहोचून खणून मृतदेह बाहेर काढला.
घरातील चार महिलांना अटक
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृताची पत्नी, सासू, मेव्हणी आणि भावजय यांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृत जितेंद्र पंडित हा मूळचा झारखंडच्या मधुपूर भागातील रहिवासी होता. सुमारे 10 वर्षांपूर्वी त्याचा विवाह काला गावातील रजनी हिच्यासोबत झाला होता आणि लग्नानंतर दोन-तीन महिन्यांतच तो सासरच्या घरी 'घरजावई' म्हणून राहू लागला होता. त्याला पाच वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा अशी दोन लहान मुले आहेत. गेल्या बुधवारी या कुटुंबात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादादरम्यान झालेल्या मारहाणीत जितेंद्र गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला, ज्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लपवला.
हे ही वाचा : बीड : 'तु मेरे साथ शादी कर वरना..', हात धरून तरूणाचा पीडितेवर...
अनैतिक संबंध असल्याचा गावकऱ्यांना संशय
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जितेंद्र हा दारूच्या आहारी गेला होता आणि घरात नेहमी भांडण करायचा. काही लोकांनी त्याच्यावर घरातील महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशयही व्यक्त केला आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, मृताची पत्नी रजनी हिने सांगितले की, तिचा पती दररोज दारू पिऊन घरात मारहाण करायचा आणि घटनेच्या दिवशीही तो नशेत असल्याने गच्चीवरून पडून त्याचा मृत्यू झाला. तिने अनैतिक संबंधांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, जितेंद्रच्या आईने मालती देवी यांनी हा सरळ-सरळ हत्येचा प्रकार असल्याचा आरोप केला असून, कौटुंबिक वादातूनच आपल्या मुलाचा बळी घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा : डोंबिवली : ड्रग्जविरोधात कारवाई, महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी..
पूर्वी खाल्ली होती जेलची हवा
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रचा त्याच्या भावजईवर वाईट डोळा होता आणि तो तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता, ज्याला सासूने कडाडून विरोध केला. याच वादात जितेंद्रने सासूच्या हाताचे बोट दाताने चावून जखमी केले होते. तसेच जितेंद्र यापूर्वी दोनदा तुरुंगात जाऊन आल्याचेही पोलिसांनी सांगितले. सदर विभागाचे एसडीपीओ सतीश सुमन यांनी माहिती दिली की, प्राथमिक दृष्ट्या हे प्रकरण कौटुंबिक कलहातून झालेली हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे दिसते आहे. फॉरेन्सिक टीमला बोलावून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.









