बीड : 'तु मेरे साथ शादी कर वरना..', हात धरून तरूणाचा पीडितेवर...

मुंबई तक

Beed crime : बीड जिल्ह्यातील परळीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीवर विनयभंग केल्याची लाज्जास्पद घटना घडली आहे. तु मेरे साथ शादी कर वरना, भागके ले जाऊंगा अशा दबात धमकी देत पीडितेचा विनयभंग केला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

'माझ्याशी विवाह कर, अन्यथा..'

point

नराधमाकडून पीडितेचा विनयभंग

Beed Crime : रोहिदास हातागळे - बीड जिल्ह्यातील परळीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीवर विनयभंग केल्याची लाज्जास्पद घटना घडली आहे. तु मेरे साथ शादी कर वरना, भागके ले जाऊंगा अशा दबात धमकी देत पीडितेचा विनयभंग केला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी शहरातील आपना चौक परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची लज्जास्पद घटना आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख अम्रु शेख अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : कल्याणमध्ये तब्बल 34 कोटींच्या हेरॉईनचा साठा जप्त, मुख्य पुरवठादाराची ओळख पटली

माझ्याशी विवाह कर, अन्यथा.. नराधमाकडून पीडितेचा विनयभंग

या प्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अम्रु शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तरुणी ही घराकाम करते. 22 मे रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास हे दुर्दैवी प्रकरण घडलं आहे. फिर्यादीने तरुणाला अडवून माझ्याशी विवाह कर, अन्यथा तुला पळवून नेईन, अशी धमकी देखील दिली होती. 

तरुणीचा हात ओढत विनयभंग

नंतर त्याच तरुणीचा हात ओढत तिचा विनयभंग देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आता परळी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 74 व 78 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

हे ही वाचा : विद्यार्थिनीला हॉटेलवर नेलं, भांगेत कुंकू भरलं अन् नको तेच.. अश्लील Video व्हायरल

दरम्यान, देशभरात महिलांवर लैंगिक शोषण आणि अत्याचारासारख्या घटना घडू लागलेल्या आहेत. यामुळे महिला, मुली आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 

हे वाचलं का?