प्रशिक्षकाने खोलीत बोलावलं अन्.., 17 वर्षीय बॉक्सरसोबत काय घडलं?

मुंबई तक

एका 50 वर्षीय बॉक्सिंग प्रशिक्षकावर 17 वर्षीय अल्पवयीन महिला बॉक्सिंगपटूचा लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी आरोपी प्रशिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

प्रशिक्षकाने खोलीत बोलावलं अन्..,

point

17 वर्षीय बॉक्सरसोबत काय घडलं?

Crime News : कर्नाटकची राजधानी बेंगलोरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 50 वर्षीय बॉक्सिंग प्रशिक्षकावर 17 वर्षीय अल्पवयीन महिला बॉक्सिंगपटूचा लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी आरोपी प्रशिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर संपंगीरामनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (22 मे) दुपारी रीतसर एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला.

आरोपी प्रशिक्षक कस्तुरबा रोडवरील स्टेडियमच्या आवारात असलेल्या एका खाजगी बॉक्सिंग क्लबमध्ये कार्यरत असून, तो गेल्या चार महिन्यांपासून पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. नुकत्याच कर्नाटकबाहेर पार पडलेल्या एका क्रीडा स्पर्धेदरम्यान या छळाची तीव्रता अधिक वाढल्याचे समोर आले आहे.

भीतीपोटी गप्प राहिली पीडिता

मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी ही पीडित खेळाडू एका बॉक्सिंग स्पर्धेसाठी चेन्नई येथे गेली असताना, प्रशिक्षकाने तिला आपल्या खाजगी खोलीत बोलावून घेतले. तिथे पीडितेने तीव्र विरोध केला असूनही आरोपीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. याशिवाय बेंगलोर येथील स्टेडियममध्येही अशाच प्रकारे वारंवार चुकीचा शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रशिक्षकाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची चेतावणी दिली होती. याच भीतीपोटी पीडितेने अनेक दिवस हा सर्व छळ सहन केला आणि आपल्या कुटुंबीयांपासून ही बाब लपवून ठेवली होती.

हे ही वाचा : बीड : विवाह सोहळ्यात फटाक्यांचा भीषण स्फोट, क्षणात झालं होत्याचं नव्हतं

क्लबच्या अंतर्गत समितीकडेही तक्रार

पीडित मुलीच्या आईने सांगितले की, त्यांची मुलगी गेल्या 10 वर्षांपासून याच खाजगी बॉक्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे. आरोपी प्रशिक्षकाची वर्तणूक बऱ्याच काळापासून संशयास्पद होती, परंतु गेल्या पाच ते सहा महिन्यांत छळाचे प्रमाण अत्यंत वाढले होते. याप्रकरणी पोलिसांत जाण्यापूर्वीच क्लबच्या अंतर्गत समितीकडे (Internal Committee) प्रशिक्षकाच्या गैरवर्तणुकीबाबत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलीच्या आईने या गंभीर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी वेगाने पावले उचलली.

हे वाचलं का?