Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...
Extramariital Affairs : पत्नीने परपुरूषासोबत अनैतिक संबंध ठेवले होते. पतीनेच हे सर्व पाहिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

देशात एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्स

रिक्षाचालकाच्या पत्नीने नवऱ्याला संपवलं

कारण आलं समोर
Extramariital Affairs : राज्यातच नाही, तर आता देशभरात, जगभरात एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्स सुरु आहे. लग्नानंतर पत्नी आपल्या पतीला सोडून दुसऱ्याबरोबरच असते. तर काही पुरूषांचे घरवाली एक आणि बाहरवाली दुसरी अशी परिस्थिती पाहायला मिळते. सध्या या अनैतिक संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. सात जन्म सोबत राहणार असं लग्नमंडपात आश्वासन देणारे हल्लीच्या युगातील पती-पत्नी अनैतिक संबंधात अडकलेले आहेत. अशीच एक घटना बिहार येथील समस्तीपुर येथे उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनेच तिच्या पतीलाच मारहाण करत त्याची हत्या केली आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: कोकणात पाऊस बरसणार, अनेक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी, तुमच्या परिसरात पाऊस बरसणार?
संबंधित प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत अटक केली आहे. दरम्यान, मृत झालेल्या एका तरुणाचे नाव सोनू कुमार आहे. तर त्याच्यासोबत पत्नी स्मिता आणि दोन मुलं तिच्या सोबत राहतात.
नेमकं काय घडलं?
मृत पती सोनू हा ऑटो रिक्षा चालक होता. त्यावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. आपल्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये, यासाठी तो दिवस रात्र मेहनत करायचा. पत्नी स्मिता आपल्या मुलांच्या शिकवणीसाठी एका शिक्षकाला घरी बोलवायची. त्या शिक्षकाचं नाव हरिओम कुमार असे आहे. तो नेहमी स्मिता आणि पती सोनूच्या मुलांच्या शिकवणीसाठी घरी येत होता. सोनूला याबाबत कसलीच माहिती मिळाली नाही.
हरिओम आणि स्मिता सोनू घरात नसले की शरीरसंबंध ठेवायचे. लहान मुलांना बाहेर खेळायला जाण्यास सांगायची आणि नंतर दोघेजण घरात शरीरसंबंध ठेवायचे. गेले काही महिने हे सुरुच होतं, एक दिवस सोनू घरी आला असता, त्याने आपल्या पत्नीला परपुरूषाच्या मिठीत पाहिलं होतं. हे पाहून सोनूच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यानंतर सोनू आणि पत्नी स्मिता यांच्यात वाद होऊ लागला होता.
हेही वाचा : मंगळ ग्रहाने राशी बदलली, काही राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ, तुमच्या राशीबाबत घ्या जाणून
सोनूच्या वडिलांनी शुक्रवारी रात्री 12 वाजता सोनू घरी आला असल्याचं सांगितलं, मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याचं शव त्या ठिकाणी पडलेलं होतं. या प्रकरणानंतर सोनूचे वडील टुनटुन यांच्या सांगण्यावरून स्मिताच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोनूची पत्नी स्मिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.