Govt Job: भारताच्या तपास यंत्रणेत मिळवा नोकरी! मोठ्या पदांसाठी भरती जाहीर... जाणून घ्या, पात्रता

मुंबई तक

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टंट सब-इंस्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताच्या तपास यंत्रणेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

point

मोठ्या पदांसाठी भरती जाहीर... जाणून घ्या, पात्रता

Govt Job: भारताच्या तपास यंत्रणेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून  इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टंट सब-इंस्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार nia.gov.in संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन  नोटिफिकेशन तपासू शकतात. 

काय आहे पात्रता? 

या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. 

इंस्पेक्टर: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी जे नियमितपणे समान पदांवर कार्यरत असलेले किंवा बेसिक कॅडर पे मॅट्रिक्स लेव्हल-06 (35,400 ते 1,12,400 रुपये) पदांवर 5 वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेले उमेदवार इंस्पेक्टर पदांसाठी अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असण्यासोबत गुन्हेगारी प्रकरणांचा तपास, गुप्तचर कार्य किंवा ऑपरेशन्स, माहिती तंत्रज्ञान किंवा दहशतवादविरोधी प्रशिक्षण किंवा दक्षता संकलन या क्षेत्रात दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. 

सब इंस्पेक्टर: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी केंद्र किंवा केंद्रशासित प्रदेशात लेव्हल-5 पे बँडमध्ये नियमित आधारावर अधिकाऱ्याची 6 वर्षे सेवा असणं गरजेचं आहे. तसेच, बॅचलर्स डिग्री आणि गुन्हेगारी प्रकरणांचा तपास किंवा गुप्तचर काम, ऑपरेशन्स इत्यादींमध्ये 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp