मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट! पालघरमध्ये दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचं काम पूर्ण...

मुंबई तक

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगानं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (3 फेब्रुवारी) पालघरमध्ये बुलेट ट्रेनसाठी दुसऱ्या बोगद्याचं ब्रेकथ्रू म्हणेज भुयारीकरण पूर्ण झाल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट!
बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट!

point

पालघरमध्ये दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचं काम पूर्ण...

Mumbai News: गुजरातनंतर आता महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगानं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (3 फेब्रुवारी) पालघरमध्ये बुलेट ट्रेनसाठी दुसऱ्या बोगद्याचं ब्रेकथ्रू म्हणेज भुयारीकरण पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. तसेच, गेल्या महिन्याच्या 2 तारखेला पहिल्या बोगद्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली होती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऑनलाइन सहभाग घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, भारताची पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली. 

बुलेट ट्रेन आधी गुजरातमध्ये धावेल

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा 508 किमी लांब कॉरिडोर 2029 पर्यंत सुरू होणार असल्याची अपेक्षा आहे. हा कॉरिडोर खुला झाल्यानंतर, गुजरातमधील अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास दोन तासांपर्यंत कमी होईल. अहमदाबादमध्ये 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी बुलेट ट्रेन अतिशय उपयुक्त ठरणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्येच बुलेट ट्रेनचं ट्रायल रन केलं जाईल. ही बुलेट ट्रेन प्रथम गुजरातमध्ये धावेल तसेच ती सुरुवातीला सूरत आणि बिलीमोरा दरम्यान धावेल. भारतीय नागरिक या हाय-स्पीड ट्रेनसाठी प्रचंड उत्सुक आहेत. 

हे ही वाचा: Govt Job: काय सांगता? टपाल विभागात तब्बल 28,000 हून अधिक पदांसाठी भरती! कोणतीही परीक्षा नाही अन्...

बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर एकूण 28 पूल... 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एकूण मार्ग 508 किलोमीटर आहे. म्हणजेच गुजरातमध्ये 348 किलोमीटरचा ट्रॅक आहे, त्यातील 4 किलोमीटरचा ट्रॅक दादरा आणि नगर हवेलीमध्ये आहे आणि उर्वरित 156 किलोमीटरचा कॉरिडॉर महाराष्ट्रात असल्याची माहिती आहे. बुलेट ट्रेनच्या या मार्गावर एकूण 12 स्थानके असतील आणि ही ट्रेन 320 किमी प्रतितास धावेल. बुलेट ट्रेन प्रकल्पात 21 किलोमीटरचे बोगदे आहेत, ज्यामध्ये समुद्राखालील 7 किलोमीटरचे बोगदे आहेत. तसेच, या प्रकल्पात आठ पर्वतीय बोगदे समाविष्ट असल्याची माहिती आहे. बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर एकूण 28 पूल बांधले जाणार आहेत, ज्यात 25 नदीवरील पूल समाविष्ट आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp