Tuljabhavani चे सोने-चांदीचे दागिने वितळवणार, नेमका का घेतला हा निर्णय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

207 kg of gold and 2570 kg of silver ornaments offered to Tuljabhavani Devi are going to be melted down
207 kg of gold and 2570 kg of silver ornaments offered to Tuljabhavani Devi are going to be melted down
social share
google news

Tuljabhavani Gold Ornaments: तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदी वितळवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तुळजाभवानी चरणी भक्तांनी 2009 पासून 2022 पर्यंत 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. पण आता हेच सोन्याचे दागिन वितळवले जाणार आहेत. ज्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल 12,62,700000 रुपये तर चांदीच्या 2570 किलो चांदीची किंमत 1,927,50000 रुपये होत आहे तर सोने व चांदीची एकूण रक्कम 1,455,450,000 रुपये किंमतीचे सोने व चांदी वितळवण्यात येणार आहे. यासाठीच त्याची दिशा व रूपरेषा कायम करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. (207 kg of gold and 2570 kg of silver ornaments offered to Tuljabhavani Devi are going to be melted down)

ADVERTISEMENT

या समितीतील सदस्य सोने वितळविण्यासाठी एक नियमावली तयार करणार आहे. ज्यासाठी समितीत शिर्डी देवस्थानची भेट घेणार असून याबाबत अभ्यासही करणार आहे. येत्या महिन्यात याबाबतची नियमावली तयार होईल. तब्बल 14 वर्षानंतर देवीच्या तिजोरीतील सोने मोजण्यात आले होते. त्यानंतर ते आता वितळवले जाणार आहे.

हे ही वाचा>> NCP : ”दादा, दादा करत तुमचं…”, अजित पवारांच्या खासदाराने सुप्रिया सुळेंना डिवचलं

सोने-चांदी दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिल्यानंतर मंदीर संस्थानने प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी समिती नेमली असून या समितीत 7 सदस्य असून त्यात महंत, पुजारी मंडळाचे सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरातसह देशभरातून भाविक तुळजाभवानी दर्शनाला येतात तर तुळजाभवानी अनेक राजघराण्यासह लोकांची कुलदेवी आहे. भक्त नवसपूर्ती झाल्यावर तुळजाभवानी देवीला सोने-चांदी याच्या वस्तू अर्पण करतात.

हे ही वाचा>> Tulsi Vivah 2023 : तुळशीच्या लग्नाचा शुभ मुहूर्त, प्रथा अन् परंपरा काय आहेत?

सोन्याचा हार, मंगळसूत्र, मणी, माळ, डोळे, बांगड्या यासह मुकुट अर्पण करतात. तर चांदीचा पाळणा, समई, सिंहासन, ताट, वाटी याचाही समावेश असतो. तर काही जण आरोग्य चांगले राहावे यासाठी सोने-चांदी याचे डोळे, अवयव तिजोरीत टाकतात. मात्र, या सगळ्याचा देवीच्या सजावटीसाठी प्रत्यक्ष वापर होतोच असं नाही. त्यामुळे हे दागिने वितळून त्यातून नवा निधी आता मंदीर संस्थान उभारणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT