Aditya L1 : सुर्यमोहिमेत मोठं यश! ISROची सलग दुसऱ्यांदा यशस्वी कामगिरी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

aditya l1 mission isro share big upadate aditya covered distance of 9.2 lakh Km findinh l1 point
aditya l1 mission isro share big upadate aditya covered distance of 9.2 lakh Km findinh l1 point
social share
google news

Aditya L1 Covered A Distance of 9.2 lakh Km : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)दिवसेंदिवस अंतराळ मोहिमेत यशस्वी कामगिरी करते आहे. आता सुर्यमोहिमेतील आदित्य एल 1 या अवकाश यानाने मोठी कामगिरी केली आहे. आदित्य L1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमी अंतर कापले आहे. यासोबत अवकाशातील ज्या स्थानावरून आदित्य सुर्याचा अभ्यास करणार आहे. त्या लँगरेंज पॉईंट 1 चा शोध सूरू केला आहे. इस्त्रोने शनिवारी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. (aditya l1 mission isro share big upadate aditya covered distance of 9.2 lakh km finding l1 point)

ADVERTISEMENT

इस्त्रोने एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर सूर्य मिशन आदित्य L1 बाबत मोठी अपडेट शेअर केली आहे. आदित्य L1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमी अंतर कापले आहे. त्याचसोबत सुर्य आणि पृथ्वी यांच्यातील लँगरेज पॉईंट 1 चा शोध सुरु केला आहे. विशेष म्हणजे आदित्य L1 ने पृथ्वीचा प्रभाव क्षेत्र यशस्वीपणे टाळून हे अंतर पार केले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे.

हे ही वाचा : ‘त्या’ प्रकरणावर अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “मी आणि छगन भुजबळ…”

हे वाचलं का?

दरम्यान इस्त्रोने पहिल्यांदा मार्स ऑर्बिटर मिशनमध्ये मंगलयानाला पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर पाठवले होते. त्यानंतर आता आदित्य एल1 ला पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर पाठवले आहे. त्यामुळे इस्त्रोने दुसऱ्यांदा ही किमया करून दाखवली आहे.

ADVERTISEMENT

वैज्ञानिक डेटा गोळा

आदित्य-L1 ने वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.STEPS इन्स्ट्रुमेंटच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करतो. खालील आकृतीत ऊर्जावान कण वातावरणातील भिन्नता दर्शविते, एका युनिटद्वारे गोळा केली जाते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Wagh Nakh : ‘ती’ वाघनखे शिवाजी महाराजांची नाहीत -इतिहास संशोधक सावंत

फेब्रुवारीमध्ये सूर्याचे पहिले फोटो पाठवणार

आदित्य-L1 वरून सूर्याचे पहिले फोटो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये उपलब्ध होईल. इस्रोच्या सुर्य मिशनमध्ये स्थापित VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील.म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील आणि सूर्याचा अभ्यास सुरू होईल. परंतु वेळोवेळी त्यांची तपासणी किंवा ते व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी ते सक्रिय केले जाऊ शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT